रणवीरचा '83' बॉक्स ऑफिसवर क्लीन बोल्ड

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनेही चित्रपटाच्या कमाईविषयी निराशा व्यक्त केली.
83 movie
83 movie
Updated on

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेता रणवीर सिंगचा '83' हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याची फारशी कमाई होताना दिसत नाहीये. या चित्रपटाने तीन दिवसांत ४७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कबीर खान (Kabir Khan) दिग्दर्शित या चित्रपटाची कथा १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या वर्ल्डकपवर (83 movie) आधारित आहे. या बिग बजेट चित्रपटात दमदार कलाकारांची मोठी फौज आहे. असं असूनही बॉक्स ऑफिसवर त्याची फारशी जादू चालताना दिसत नाहीये. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनेही चित्रपटाच्या कमाईविषयी निराशा व्यक्त केली. ख्रिसमस वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होईल, असा अंदाज त्याने वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. (Ranveer Singh Movie)

83ची कमाई-

शुक्रवार- १२.६४ कोटी रुपये

शनिवार- १६.९५ कोटी रुपये

रविवार- १७.४१ कोटी रुपये

एकूण- ४७ कोटी रुपये

'स्पायडर मॅन: नो वे होम' आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाकडून '83'ला तगडी टक्कर मिळतेय. पुढील काही दिवसांत आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने कमाईत फारशी वाढ होईल, याची शक्यता कमी जाणवतेय. शाहीद कपूरचा 'जर्सी' हा चित्रपट ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. तर जानेवारीत एस.एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित 'RRR' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे '83'कडे बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी फार कमी वेळ आहे. '83'ने परदेशात जवळपास २६.१६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

83 movie
'साप मेला असेल'; सलमानसाठी रविना टंडनची पोस्ट चर्चेत

रणवीर-दीपिकासोबतच या चित्रपटात पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर आणि एमी विर्क अशी कलाकारांची मोठी फौज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.