रणवीरच्या '83' चा टी.व्ही वर्ल्ड प्रीमियर; कुठे,कधी,किती वाजता?

कबीर खान दिग्दर्शित '83' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
83 Movie Star cast. (Ranveer Singh And Other actors)
83 Movie Star cast. (Ranveer Singh And Other actors)Google
Updated on

भारतीय क्रिकेट टीमनं 1983 साली पहिल्यांदा विश्वचषक पटकावण्याचा पराक्रम केला होता. भारतीय इतिहासात त्या दिवसाची,वर्षाची नोंद मोठ्या बहुमानानं केली गेली. त्यावर आधारित असलेल्या रणवीर सिंगच्या(Ranveer Singh) '83' सिनेमा जर मोठ्या पडद्यावर पाहण्याचा राहून गेला असेल तर मग आता तुमच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच हा सिनेमा छोट्या पडद्यावर म्हणजे एका वाहिनीवर दाखवला जाणार आहे. पण अद्याप हा सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची तारीख जाहिर केली गेलेली नाही.

रणवीर सिंगचा '83' सिनेमा,20 मार्च रोजी,रविवारी रात्री 8 वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर दाखविला जाणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा 24 डिसेंबर,2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमानं 100 करोडच्या क्लबमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. खरंतर यापेक्षा अधिक कमाई सिनेमा करेल असं वाटलं होतं, पण सिनेमा प्रदर्शित झाला अन् पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं,त्यामुळे निर्बंध कडक केले गेले,अनेक राज्यात सिनेमागृह पुन्हा बंद केली गेली. शो ची संख्या त्यामुळे अनेक ठिकाणी कमी केली गेली त्याचाही फटका बसला.

83 Movie Star cast. (Ranveer Singh And Other actors)
अभिनेत्री पल्लवी जोशीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

या सिनेमात रणवीरनं कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर दीपिका पदूकोणने(Deepika Padukone) कपिल देव(Kapil Dev) यांची पत्नी रोमी देव हिची व्यक्तिरेखा साकारली आहे. समिक्षकांनी सिनेमाला गौरवूनही कोरोनामुळे मात्र सिनेमाला हवं तसं यश बॉक्सऑफिसवर मिळालं नाही. रणवीरला या सिनेमासाठी नुकताच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार मिळाला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे. नेटफ्लिक्सवर हिंदीत तर डिस्नेवर इतर दक्षिण भारतीय भाषांमध्ये डब केला जाणार आहे. पण अद्याप या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो कधी दाखवला जाईल याची तारीख सांगण्यात आलेली नाही. नियमांनुसार अद्याप हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित व्हायला हवा होता पण तसं झालं नाही. असो, सर्वसामान्य प्रेक्षाकांना मात्र तो आता घरबसल्या छान आरामात टी.व्ही वर पहाता येईल यापेक्षा दुसरं सुख ते काय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.