Badshah in Mumbai Police: महाराष्ट्र पोलिस सायबर सेलमध्ये रॅपर बादशाहची चौकशी, हे आहे कारण

म्हणुन बॉलिवुडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहला महाराष्ट्र पोलिस सायबर सेलमध्ये हजर राहावं लागलंय
Rapper Badshah reaches maharashtra cyber cell after being summoned by police
Rapper Badshah reaches maharashtra cyber cell after being summoned by police SAKAL
Updated on

बॉलिवुडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह महाराष्ट्र पोलिस सायबर सेलमध्ये हजर झालाय. एका प्रसिद्ध मीडिया कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने सोमवारी रॅपर बादशाहला चौकशीसाठी बोलावले.

मीडिया कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार केलेल्या आरोपामुळे बादशहाला महाराष्ट्र पोलिस सायबर सेलमध्ये हजर राहावं लागलंय. काय आहे प्रकरण? जाणुन घ्या.

Rapper Badshah reaches maharashtra cyber cell after being summoned by police
Prajakta Mali: २२ देश, ६२७ लोकं आणि... प्राजक्ताने आयुष्यात केली 'ही' खास गोष्ट, स्वतःला दिलं 'हे' नाव

मीडिया कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीकडे IPL 2023 साठी विशेष प्रसारण अधिकार आहेत, परंतु फेअरप्ले ऍप आणि इतर प्लॅटफॉर्मवर सामन्यांचे अनधिकृत प्रसारण केलं जातंय. यामुळे कंपनीचे 100 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालंय.

रॅपर बादशाहला महाराष्ट्र सायबर सेलने याप्रकरणी मुंबईत चौकशीसाठी बोलावले आहे. बादशाह या अॅपची जाहीरात करत होता. फेअरप्ले अॅप ही वादग्रस्त महादेव अॅपची उपकंपनी आहे.

यामुळे वाया कॉम 18 च्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबरने फेअर प्लेवर डिजिटल कॉपी रायटरचा गुन्हा दाखल केला.

सूत्रांनी सांगितले की, बादशाहने फेअर प्लेची जाहिरात केली होती, त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

या प्रकरणी बॉलिवूडमधील ४० कलाकारांना समन्स बजावले जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. बॉलीवूड अभिनेता संजय दत्तनेही या अॅपचा प्रचार केला असून त्यालाही समन्स बजावले जाऊ शकते.

फेअरप्लेने इंडियन प्रीमियर लीग 2023 चे स्क्रीनिंग केले होते. IPL 2023 चे सामने बेकायदेशीरपणे प्रवाहात आणल्याचा आरोप या फेअरप्ले अॅपवर लावण्यात आलाय. बादशाहने केलेल्या अॅपच्या जाहिरातीमुळे सायबर क्राईम सेलने त्याला समन्स पाठवले होते. याप्रकरणी बादशाह चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिस सायबर सेलमध्ये हजर झाला.

Rapper Badshah reaches maharashtra cyber cell after being summoned by police
Ritiesh Deshmukh Comment On Jawan : 'शाहरुख म्हणजे अ‍ॅटिट्युडचा बाप', जवान पाहून रितेश इतका भारावला की...!

या प्रकरणी संजय दत्तसह 40 बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. Viacom नुसार, त्यांच्या परवानगीशिवाय FairPlay ने Tata IPL 2023 चे थेट प्रक्षेपण करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावले होते. यामुळे वायाकॉमला 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नुकतेच, महादेव बुक अॅपच्या संदर्भात मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे. आणि यात रणबीर कपूर, हुमा कुरेशी, कपिल शर्मा आणि श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.