Rashmika Mamdanna: 'मृत्यूच्या दाढेतून वाचले', फ्लाईटच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर रश्मिकाने सोडला सुटकेचा निःश्वास; नेमकं काय घडलं?

Rashmika Mamdanna: सध्या रश्मिका ही तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
Rashmika Mamdanna
Rashmika Mamdanna
Updated on

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सध्या रश्मिका ही तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, तिच्यासोबत अशी घटना घडली आहे, ज्यामध्ये ती थोडक्यात बचावली आहे. रश्मिकाच्या या पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

रश्मिकानं शेअर केला फोटो

रश्मिका ही ज्या फ्लाइटने प्रवास करत होती, त्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. रश्मिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या सीटवर बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अशा प्रकारे आम्ही मृत्यूच्या दाढेतून वाचलो..'. रश्मिकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा दासही दिसत आहे.

फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग

रश्मिका ज्या विमानातून प्रवास करत होती ते विमान मुंबईहून हैदराबादला जात होते. पण त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे विमान परत मुंबईत उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

Rashmika Mandanna
Rashmika Mandanna

रश्मिकाचे चित्रपट

रश्मिकाचा काही महिन्यांपूर्वी 'ॲनिमल' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता रश्मिका ही पुष्पा-2 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांच्याशिवाय फहद फासिल, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू, अनुसया भारद्वाज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.