Rashmika Mandanna: रश्मिकाच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! 4 आरोपींना घेतले ताब्यात! मुख्य आरोपी अजूनही फरार

रश्मिका मंदान्ना तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती.
rashmika mandanna deepfake video case
rashmika mandanna deepfake video caseSAKAL
Updated on

Rashmika Mandanna: साऊथची लेडी सुपरस्टार रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या अॅनिमल चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला आहे. तिने या चित्रपटात गीतांजलीची भूमिका साकारली होती.

त्यापुर्वी रश्मिका मंदान्ना तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. काही दिवसांपुर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता जो डीपफेक होता.

काही काळापूर्वी तिचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR नोंदवला होता. आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आता अलीकडेच पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

rashmika mandanna deepfake video case
Sandeep Reddy Wanga: 'अ‍ॅनिमल'च्या जबरदस्त यशानंतर वांगानं केली एक दोन नव्हे तर तीन सिनेमांची घोषणा! 'हे' सुपरस्टार करणार काम!

रश्मिका मंदान्नाच्या डिपफेक व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना शोधले आहे. हे मुख्य आरोपी नाहीत तर फक्त अपलोडर आणि व्हायरल करणारे आहेत. त्यांनी हा व्हिडिओ तयार केलेला नाही.

अलीकडे, या प्रकरणावर ट्विट करताना एएनआयने म्हटले आहे की, पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डिप फेक व्हिडिओ प्रकरणातील चार संशयितांना शोधले आहे. हे लोक मेकर नसून अपलोडर आहेत. अशा परिस्थितीत पोलीस सध्या या प्रकरणाच्या मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.

rashmika mandanna deepfake video case
Record MPs Suspended: हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?" संसदेतील खासदारांच्या निलंबनावरून मराठमोळ्या अभिनेत्रीचा सवाल!

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रश्मिका मंदान्नाचा एक व्हिडिओ मोठ्या व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिच्यासारखी एक महिला लिफ्टमध्ये जाताना दिसत आहे, जिच्या चेहऱ्याच्या जागी रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता.

मात्र व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती रश्मिका नसून परदेशात राहणारी सोशल मीडिया ब्लॉगर झारा पटेल होती. यावर बिग बी यांनी ट्विट केले होते. यानंतर खुद्द रश्मिका मंदान्नानेही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच कलाकारांपासून ते कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत सर्वांनी मत मांडत योग्य कारवाईची मागणी केली होती.

rashmika mandanna deepfake video case
Prathamesh - Mugdha Wedding Updates: पारंपरिक थाटात झाला प्रथमेश - मुग्धाचा हळदी समारंभ, फोटो व्हायरल

रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओसोबतच अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामध्ये कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि काजोलच्या नावाचाही समावेश आहे. अमिताभ बच्चनपासून अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांनी यावर चिंता व्यक्त करत दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.