Rashmika Mandanna Deepfake Video: प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. रश्मिकाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होत आहे. या क्लिपमधील मुलगी काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट जिम वेअरमध्ये लिफ्टच्या आत आल्याचे दिसत आहे.
रश्मिकाचा हा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते संतापले आहेत. त्यानंतर अनेकांनी सोशल मिडियावर या व्हिडिओवर प्रतिक्रिया देणं सुरु केले. मात्र ही अभिनेत्री रश्मिका नव्हे तर झारा पटेल आहे.
रश्मिका मंदान्नाचा हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने अमिताभ बच्चन देखीलही संतापले आहेत. बिग बींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर आता या व्हायरल व्हिडिओवर अखेर रश्मिकाने मौन सोडलं आहे. रश्मिकाने तिच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिका आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, "मला हे शेअर करताना खूप वाईट वाटत आहे. माझ्याबद्दलचा एक डीपफेक मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर शेयर केला जात आहे. या बद्दल बोलणं गरजेच आहे.
प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर हे माझ्यासाठीच आपणासाठी, सर्वांसाठीच धक्कादायक आहे. तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जातो, हे धक्कादायक आहे. आज एक महिला म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते जे माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम बनले आहे.
पण जर मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना असं घडलं असतं तर मी ते कसं हाताळलं असतं याची कल्पनाही मला करवत नाही. इतर अनेक लोक अशा प्रकरणाला बळी पडू नये यासाठी संबोधित करणे आणि या गोष्टीचा निषेध करणे गरजेचे आहे." सध्या रश्मिकाच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा होत आहे. तिचे चाहते तिला पाठिंबा देत आहेत.
तर दुसरीकडे रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, केंद्र सरकारने देखील याची दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे." आयटी नियमांनुसार या प्रकरणाचा तपास करुन यावर कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.