Deepfake Rashmika Mandanna: रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओसंबंधी पोलिसांनी केली ही मोठी कारवाई

काही दिवसांपुर्वी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झालेला, त्यावर आता पोलिसांनी मोठी कारवाई केलीय
rashmika mandanna deepfake video case delhi police register fir
rashmika mandanna deepfake video case delhi police register fir SAKAL
Updated on

गेल्या काही दिवसांपासुन दिवसांपासुन डीपफेक व्हिडीओचं प्रमाण वाढतंय. सर्वप्रथम रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडीओने एकच खळबळ उडाली.

पण आता मात्र ज्यांनी कोणी हा रश्मिकाचा हा डीपफेक व्हिडीओ बनवला त्यांची आता काही खैर नाही. कारण या व्हिडीओसंबंधी पोलिस आता अ‍ॅक्शन मोडवर आहेत. पोलिस आता मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

rashmika mandanna deepfake video case delhi police register fir
Grammy Awards 2024: पंतप्रधान मोदींनी लिहीलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारात मिळालं नामांकन

रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओसंबंधी पोलिसांनी नोंदवला FIR

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओविरोधात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी एफआयआर नोंदवला. रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओबाबत पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की, या प्रकरणी विविध कलमांखाली FIR नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. असं पोलिसांनी सांगितलंय.

आयटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

पोलिसांनी रश्मिका मंदानाच्या डीपफेक एआय व्हिडिओविरुद्ध आयपीसी, 1860 च्या कलम 465 आणि 469 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 66C आणि 66E अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीमधील विशेष पोलिस पथकाने सांगितले की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, आम्ही तपास सुरू केला आहे.

rashmika mandanna deepfake video case delhi police register fir
Hemangi Kavi: आपली मनमानी करून चालत नाही, दिवाळीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट व्हायरल

डीपफेक व्हिडीओविरोधात महिला आयोग आक्रमक

रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओची दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली असल्याचे त्यांंनी सांगितले. दिल्ली महिला आयोगाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे, आजपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आयोगाने या प्रकरणातील आरोपींच्या तपशीलासह FIR ची प्रत 17 नोव्हेंबरपर्यंत मागवली आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी जारा पटेल नावाच्या मुलीचा चेहरा मॉर्फ करुन रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला होता. याविषयी सर्वत्र संतापाची लाट उसळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.