Ratna Pathak: 'लाज कशी वाटत नाही जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा....' नसिरुद्दीन शहांच्या पत्नी रत्ना पाठक एवढ्या का संतापल्या?

यापूर्वी देखील रत्ना पाठक शहा या त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय होत्या. त्यांनी नेहमीच आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे.
Ratna Pathak Shah bollywood Actress interview
Ratna Pathak Shah bollywood Actress interviewesakal
Updated on

Ratna Pathak Shah bollywood Actress interview : बॉलीवूडमध्ये काही सेलिब्रेटी असे आहेत की, ज्यांना त्यांच्या वक्तव्यामुळेच जास्त प्रसिद्ध मिळत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये प्रख्यात अभिनेत्री रत्ना पाठक यांच्या नावाचा उल्लेख अनेकदा होतो. त्यांनी आता बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांचे ते वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

यापूर्वी देखील रत्ना पाठक शहा या त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय होत्या. त्यांनी नेहमीच आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे. आपल्या भूमिकेसाठी भलेही आपल्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं तरी हरकत नाही. अशी भूमिका रत्ना शहा यांनी नेहमीच घेतली आहे. सध्या त्या त्यांच्या आगामी धक धक नावाच्या चित्रपटांवरुन चर्चेत आल्या आहेत.

Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

या चित्रपटामध्ये दिया मिर्झा, फातिमा सना शेख, संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या रत्नाजी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. रत्नाजी यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ नाटक, चित्रपट, टीव्ही मनोरंजन, वेब सीरिज या सारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आता बॉलीवूडमधील एका गोष्टीकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

त्या मुलाखतीमध्ये रत्ना शहा म्हणाल्या की, बॉलीवूडमध्ये काही कलाकार आपल्या वयापेक्षा कमी असणाऱ्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करतात. त्यावर त्यांनी विचार करण्याची गरज आहे. ते काही बरोबर दिसत नाही. त्यामुळे त्यांना ट्रोलही व्हावे लागते. मला एक गोष्ट त्यांना सांगायची आहे की, तुम्हाला ट्रोल व्हावे लागतं हे माहिती असूनही तुम्ही तिच गोष्ट पुन्हा कशी काय करता, याची तुम्हाला काहीच कशी लाज वाटत नाही, असे रत्नाजी यांनी म्हटले आहे.

मला एवढेच म्हणायचे आहे की, आपले वय काय आणि आपण करतो काय याचे भान ठेवणे गरजेचे आहे. त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. महिला आणि सिनेमा यावर बोलताना त्या म्हणाल्या, आता आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टींबाबत सुधारणा होत आहे. वैचारिक फरक पडत आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. असेही रत्नाजी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.