रविना टंडनने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दशके घालवली आहेत. चित्रपटानंतर ती आता ओटीटीवर उत्तम काम करत आहे. रविनाला एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार आणि आता पद्मश्री मिळाले आहेत. अलीकडेच, तिने खुलासा केला की तिला शाहरुख खानसोबत 'छैय्या छैय्या' गाण्याची ऑफर देण्यात आली होती पण एका मोठ्या कारणास्तव तिने ते नाकारले.
एआर रहमानचे 'दिल से' मधील 'छैय्या छैय्या' हे सुपरहिट गाणे होते, ज्यामध्ये मलायका अरोरा दिसली होती. या गाण्याने मलाइकाला खूप प्रसिद्धी दिली. मणिरत्नम निर्मित 'दिल से' हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या रोमँटिक थ्रिलरमध्ये शाहरुख खान आणि मनीषा कोईराला आणि प्रीती झिंटासारखे स्टार्स दिसले.
आता रवीनाने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, 'रक्षक'मधील 'शहर की लड़की' हे गाणे हिट झाल्यानंतर तिला सतत आयटम सॉन्गच्या ऑफर्स येत होत्या. ज्यामध्ये, 'छैय्या छैय्या' देखील ऑफर केला होता. याशिवाय अनेक मोठ्या आयटम नंबरसाठी मला संपर्क केला जात होता. पण मी ते करण्यास नकार दिला कारण त्या काळात स्टिरियोटाइप करणे खूप सोपे होते'.
'शहर की लडकी हे गाणे केल्यानंतर मी छैय्या छैय्या गाण्याला नकार दिला. कारण शहर की लडकी या गाण्यानंतर मला फक्त आणि फक्त आयटम सॉन्गच्याच आॅफर येत होत्या. त्यामुळे मी छैय्या छैय्या या गाण्याला नकार दिला'. रवीना टंडन ही कायमच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते.
रवीना टंडन हिच नाहीतर शिल्पा शेट्टी हिला देखील या गाण्याची आॅफर होती. या गाण्याला करण्यास रवीना आणि शिल्पा शेट्टी यांनी नकार दिला होता. या दोघींनंतर या गाण्याची आॅफर मलायका अरोराला मिळाली आणि विशेष म्हणजे मलायकाने हे गाणे करण्यास होकार देखील दिला आणि हे गाणे सुपरहिट ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.