कन्नड सिनेमा केजीएफ चॅप्टर २(KGFChapter 2) प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्सऑफिसवर जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे. यशसोबतच सिनेमातल्या इतर कलाकारांच्या अभिनयाला देखील प्रेक्षक चांगलेच पसंत करीत आहेत. यामध्येच आता एका थिएटरमधला एक व्हिडीओ या सिनेमातील अभिनेत्री रविना टंडननं(Raveena Tandon) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकाल की रविनाच्या एका सीनवर थिएटरमधील लोकं चक्क पैसे उडवत आहेत आणि नुसता आरडा-ओरडा सुरु आहे.
रवीनाने 'केजीएफ चॅप्टर २' चा जो व्हिडीओ शेअर केला आहे,त्यात ती एका पुस्तकाची पानं उलटत आहेत,ज्यावर 'केजीफ चॅप्टर २' लिहिलं आहे. हा सिनेमाचा शेवटचा सीन आहे,जो सिनेमाच्या पुढच्या भागाची म्हणजे 'केजीएफ चॅप्टर ३' ची अनाऊन्समेंट करतो. जसा हा सीन सुरु होतो तसं लगोलग प्रेक्षक समोरच्या पडद्यावर पैसे फेकायला लागतात. या व्हिडीओला शेअर करत रविनानं सिनेमाला मिळणाऱ्या यशासाठी आनंद व्यक्त केला आहे. आणि लोकांनी वेड्यासारखं प्रेम केजीएफवर केल्याबद्दल तिनं धन्यवादही मानले आहेत.
याबरोबरच रविनानं व्हिडीओमध्ये सिनेमाच्या शेवटच्या दिवसाचं शूटिंग आणि शेवटच्या शॉटची झलकही शेअर केली आहे. व्हिडीओच्या शेवटी रवीनानं सिनेमात बोललेला संवाद देखील या व्हिडीओत सामिल करण्यात आला आहे. ज्यात रवीना बोलताना दिसतेय- 'घुस के मारेंगे'. व्हिडीओ शेअर करीत रवीनानं प्रेक्षकांनी आपल्या सिनेमावर इतकं प्रेम केलं यासाठी 'थॅंक्यू' म्हटलं आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''खूप वर्षांनतर मी सिनेमाच्या स्क्रीनवर लोकांना पैसे उधळताना पाहतेय. लास्ट डे,लास्ट शूट,ही एक आग आहे...प्रेमासाठी आभारी आहे''.
'केजीएफ चॅप्टर २' बद्दल बोलायचं झालं तर प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती होमबेअल फिल्म्स बॅनर अंतर्गत विजय किरागंदूरनं केली आहे. 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये यश आणि रविना टंडन व्यतिरिक्त संजय दत्त(Sanjay Dutt),श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राजसारख्या दर्जेदार कलाकारांनीही काम केलं आहे. या सिनेमाला भारतात कन्नड,तेलुगु,हिंदी,तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.