Raveena Tondon on Kedarnath Couple: त्यांची काय चुक.. केदारनाथ समोर केलं प्रपोज म्हणुन पोलीसांची कारवाई, रविना भडकली

प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला हातात रिंग घेऊन प्रपोज करताना दिसत आहे
Raveena Tandon supports couple in viral proposal video at Kedarnath temple
Raveena Tandon supports couple in viral proposal video at Kedarnath templeSAKAL
Updated on

Raveena Tondon on Kedarnath Couple News: सध्या एका व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला हातात रिंग घेऊन प्रपोज करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. मंदिरासमोरील या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना देखील दुखावल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. 

(Raveena Tandon supports couple in viral proposal video at Kedarnath temple)


Raveena Tandon supports couple in viral proposal video at Kedarnath temple
72 Hoorain Review: दहशतवाद्याच्या डोळ्याची झापडं उघडणारा... कसा आहे 72 हुरे, वाचा एका क्लिकवर

अशातच सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने या प्रकरणावर त्या कपलची बाजू घेतलीय. रवीना लिहीते.. रवीना टंडनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आपला देव कधीपासून त्या भक्तांच्या विरोधात गेला ज्यांना आपल्या प्रेमाचा क्षण त्याच्या आशीर्वादाने पवित्र करायचा आहे?

कदाचित पाश्चिमात्य पद्धतीनुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीनुसार प्रपोज करणे सुरक्षित आहे. फुले, मेणबत्त्या आणि चॉकलेट्स…. खूप दुःखी! ज्यांना केवळ आपल्या नात्यासाठी आशीर्वाद घ्यायचा होता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. अशी पोस्ट रविनाने केलीय.

केदारनाथ मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे.

मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी श्री केदारनाथ मंदिर परिसरात धार्मिक भावनांच्या विरोधात युट्युब शॉर्टस, व्हिडीओ किंवा इन्स्टाग्राम रील्स बनवणाऱ्यांवर कडक नजर ठेवून आवश्यक कारवाई करण्यात येईल असं म्हंटलं आहे. ज्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेतली जाईल असंही त्यांनी म्हंटलं आहे.

या जोडप्याने मंदिर परिसरात अशा प्रकारे एकमेकांना प्रपोज करणे मंदिर समितीला आवडले नाही. या जोडप्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी त्यावर कारवाई केली आणि पोलिसांना पत्र लिहून व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

अशा स्थितीत पोलिसांनीही या दाम्पत्यावर कारवाई केल्याची चर्चा आहे. यावरून सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.