Raveena Tondon : 'टीप टीप बरसा पानी' शुटिंगच्यावेळी आई वडिलांना...' रविनाचा खुलासा

बॉलीवूडमध्ये ती गेल्या तीन दशकांहून अधिक काळ असणाऱ्या रविना आणि अक्षय कुमारच्या रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते.
Raveena Tondon
Raveena Tondon esakal
Updated on

Raveena Tondon News : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ही नेहमीच तिच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून रविना तिच्या वेगळ्या प्रतिक्रियांसाठी चर्चेत आली आहे. रविनानं आता एका मुलाखतीमध्ये तिच्या मोहरा चित्रपटातील त्या गाण्याविषयी जो खुलासा केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

बॉलीवूडमध्ये ती गेल्या तीन दशकांहून अधिक काळ असणाऱ्या रविना आणि अक्षय कुमारच्या रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते. यावर रविनानं प्रत्येकवेळी स्पष्टीकरणही दिले आहे. ज्या गोष्टींना बराच काळ लोटला आहे त्यांच्यावर आपण काय बोलायचं. अनेकांना त्यात फार रस असतो म्हणून आपणही त्यावर प्रतिक्रिया दयायची हे मला काही पटत नाही. असे रविनाचे म्हणणे होते.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

एका मुलाखतीमध्ये रविनानं मोहरामध्ये आपण जेव्हा मोहरा चित्रपटातील टीप टीप बरसा पानी गाण्याचे चित्रिकरण करत होतो तेव्हाच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. मला तर ते गाणं शुट करताना खूप भीती वाटत होती. त्यातील बोल्डनेस त्यावेळी खूपच लाऊड होता. आताही ते गाणं चाहत्यांना आवडते त्याचे कारण ते गाणं आणि त्यातील बोल्डनेसपणा. त्यावेळी या गाण्यानं प्रेक्षकांना वेड लावले होते.

Raveena Tondon
Heeramandi Series : काय आहे 'हिरामंडीचा' इतिहास? भन्साळींना झाला वेबसीरिज निर्मितीचा मोह

त्या गाण्याच्या शुटींगचा दिवस होता. मी सेटवर गेले तेव्हा मला सीन समजावून सांगण्यात आले. अक्षयलाही सुचना देण्यात आल्या. माझे आई वडील या गाण्याच्या वेळी स्टुडिओमध्येच होते. तेव्हा मला त्यांच्यासमोर ते बोल्ड सीन करणे जरा अवघडल्यासारखे होते. मी निराश झाले होते. मला काय करावे कळेना. अशावेळी मी दिग्दर्शक आणि निर्माता यांना त्याविषयी सांगितले. त्यांनी माझी अडचण समजून घेतली.

Raveena Tondon
Salman Khan: ऑनस्क्रीन किसिंग सीन नको रे बाबा! सलमान खान असं का म्हणतो?

दिग्दर्शक - निर्मात्यांनी आई वडिल आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता त्यांना सेटवरील दुसऱ्या खोलीत बसण्याची विनंती केली होती. त्याचे कारण त्या लहान मुलानं मला त्या गाण्यामध्ये त्या बोल्डसीनमध्ये पाहू नये असे मला वाटत होते. अशी आठवण रविनानं यावेळी सांगितली.

Raveena Tondon
Viral Video : राहुल-प्रियांका यांची धमाल! बर्फातून केली बाईक रायडिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.