Zawahiri: काश्मीर-आसाममधील 'अल जवाहिरींचा' खात्मा करा! बीजेपीचे रविकिशन संतापले

भोजपूरी चित्रपटांतून जनमाणसांत अमाप लोकप्रियता मिळवणारे अभिनेते म्हणून रविकिशन यांना ओळखले जाते. ते आता बीजेपीचे (Bjp Mp Ravi kishan) खासदार देखील आहे.
Zawahiri news
Zawahiri newsesakal
Updated on

Ravi kishan News: भोजपूरी चित्रपटांतून जनमाणसांत अमाप लोकप्रियता मिळवणारे अभिनेते म्हणून रविकिशन यांना ओळखले जाते. ते आता बीजेपीचे (Bjp Mp Ravi kishan) खासदार देखील आहे. ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी देखील सोशल मीडियावर परिचित असणारे सेलिब्रेटी आहे. त्यांनी अल जवाहिरीच्या पार्श्वभूमीवर एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. अलकायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला (al qaeda leader zawahiri ) अमेरिकेच्या एका ड्रोननं ठार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

यासगळ्या परिस्थितीवर रविकिशन यांनी परखडपणे प्रतिक्रिया दिली आहे. जी चर्चेत आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केवळ एका जवाहिरीला मारल्यानं जगातील आतंकवाद हा काही संपणार नाही. आता भारतात लपलेल्या अल जवाहिरींना शोधून मारण्याची गरज आहे. असे रविकिशन यांनी म्हटले आहे. काश्मीर आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर अल जवाहिरी आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करायला हवा.

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील जवाहिरीला ड्रोनच्या साह्यानं मारल्याचा दावा केला आहे. जगभरातील माध्यमांनी त्याला पुष्टी दिल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाला जवाहिरी काबूलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला मारण्यात आले. ओसामा बिन लादेन नंतर अमेरिकेचा हा दुसरा हल्ला आहे. ओसामाला देखील पद्धतशीर प्लॅनिंग करुन संपवण्यात अमेरिकेला यश आले होते. त्यानंतर अमेरिकेचे हे दुसरे मोठे ऑपरेशन म्हणावे लागेल.

Zawahiri news
Al-Aqsa मशिद अरब-इस्त्रायलमधील वादाचं कारण का ठरलीये?

लादेन नंतर अल जवाहिरी अल कायद्याचा म्होरक्या झाला होता. ओसामा बिन लादेनला मे 2011 मध्ये मारण्यात आले. त्यानं जवाहिरीसोबत प्लॅन करून 9/11 चे प्लॅनिंग केले होते. त्यानंतर जवाहिरीला मारण्यासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात मोठी डील देखील झाली होती. यासंबंधी पाकिस्तानने अमेरिकेकडून मदत मागितली होती. त्यानंतर त्यांना आता अमेरिकेकडून मदत मिळाली आहे.

Zawahiri news
Video: "विमान दहा मिनिटं थांबवलं"; CM शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.