Ravindra Mahajani Death: 'देवता', 'झुंज', 'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार' या सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातुन मराठी मनोरंजन विश्वात ओळख निर्माण करणारे रविंद्र महाजनी यांनी जगाचा निराप घेतला.
तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील फ्लॅटमध्ये रवींद्र मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांचा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
रविंद्र महाजनी यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेयर करत त्यांच्यासोबत काम करतांना आलेल्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर राजकिय मंडळींनी देखील त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट शेयर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र महाजनी यांच्याबद्दल ट्वीट केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.'
तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ट्विटमध्ये म्हणतात की, आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!'
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटमध्ये लिहिलयं की, 'मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानं दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.
रवींद्र महाजनी यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे.'
'मराठी चित्रपटसृष्टीत चतुरस्त्र अभिनेता म्हणून यशस्वी कारकीर्द गाजविणाऱ्या रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अत्यंत दुःखी झालोय.
उत्तुंग अभिनयासह विविध भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली! '
असं ट्विट करत भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केली आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.