नागपूर : तुम्ही स्वदेश चित्रपच बघितला का? दिग्गज अभिनेता शाबरूख खान सोबत एक नवीन अभिनेत्री दिसून आली. या अभिनेत्रिचे नाव गायत्री जोशी आहे. तिला प्रेक्षकांनी पसंद केले. तिच्या अभिनयाला दाद दिली. हा चित्रपट सोडला तर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. यामुळे ती कुठे आहे आणि काय करीत आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. चला तर जाणून घेऊया सद्या ती काय करते...
क्लास आणि मास दोघांवरही गारुड करणारा आशुतोष गोवारीकर यांचा "लगान' चित्रपट भारतासह विदेशातही तुफान चालला. यानंतर आशुतोष यांनी वेगळ्या धाटणीचा चित्रपट करायचे ठरविले. चित्रपटातील नायिका नवीन चेहरा असावा, असे ठरले. नायक म्हणून शाहरुखच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. चित्रपट संयत, सामाजिक रूढी-परंपरा दाखवत, ग्रामीण जीवनाच्या अंगाने त्यांचे जीवन, अडचणी दाखवणारा, असा तयार करायचा होता.
शाहरुखच्या नेहमीच्या लव्हर बॉय, स्टार बिरुदाला छेद देणारी कथा असल्याने तो या चित्रपटात काम करायला उतावीळ होता. आता उत्सुकता होती नायिकेची. नावाजलेला दिग्दर्शक, मोठे बॅनर आणि तगडी स्टारकास्ट असल्यामुळे अनेक नावाजलेल्या हिरोईनसह नवललनाही पडद्यावर पदार्पणासाठी आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्नरत होत्या.
अचानक काही दिवसांनी नायिकेच्या नावाची घोषणा झाली, गायत्री जोशी. मराठी नायिका असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शाहरुखच्या नासामध्ये काम करणाऱ्या मोहन भार्गव या कॅरेक्टरला गायत्रीच्या चरणपूर येथील गीता या शिक्षिकेने तेवढीच तोलामोलाची साथ दिली. पडद्यावर या जोडीला पसंत केले गेले. गायत्रीचं मराठमोळं सौंदर्य आणि निरागसता यामुळे शाहरुखसमोर ती कोठेही कमी पडल्याचं दिसत नाही. चित्रपट समीक्षकांसह जनतेनेही भरभरून कौतुक केले. एका रात्रीत स्टार होण्याचं भाग्य तिला लाभलं. त्यानंतर मात्र ती रूपेरी पडद्यावरून गायब झाली.
नागपुरात 20 मार्च 1977 रोजी गायत्रीचा जन्म झाला. येथील माउंट कार्मेल हायस्कूलमध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर आई-वडिलांसोबत ती मुंबईला गेली व कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली. गायत्रीने विविध जाहिरातींमध्ये काम केले. मॉडेलिंगमध्ये तिला चांगली ओळख मिळाली. त्यानंतर तिने 1999 मध्ये फेमीना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. यात ती पाचव्या स्थानावर होती.
उद्योगपती ओबेरॉयशी विवाह
गायत्रीने त्यावेळी ती डेट करीत असलेल्या विकास ओबेरॉयशी लग्न केलं. विकास ओबेरॉय मुंबईत "रिअल इस्टेट टायकून' म्हणून प्रसिद्ध आहेत. लास वेगास येथे हा लग्नसोहळा पार पडला. सध्या ती आपल्या पतीसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळत आहे. तिला दोन मुले आहेत. आता "वन फिल्म वंडर' या प्रकारात तिची गणना होत आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.