Renuka Shahane On Me Too : '२५ वर्षांनी बोलले, त्यानं काय फरक पडतो? तुम्ही कधीच...' शहाणेंनी सुनावले!

जर एखादी बुद्धिमान महिला असेल तर तिनं उपस्थित केलेल्या प्रश्नानं अनेकांना त्रास होतो. तिचा सेटवरील वावर अनेकांना कोड्यात टाकतो.
Renuka Shahane On Me Too
Renuka Shahane On Me Too
Updated on

Renuka Shahane On Me Too : मी टू चे आरोप जेव्हा बॉलीवूडमध्ये सुरु झाले तेव्हा तर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. २०१८ मध्ये मी टू चे प्रकरण सुरु झाले. यासगळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेणूका शहाणे यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

मी टू आंदोलनाच्या वेळी अनेकांनी मला गप्प राहण्यास सांगितले होते. त्यावेळी मला अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. लहानपणापासून महिलांकडे वेगळ्या भूमिकेतून पाहिले जाते.

पिंकव्हिलाशी बातचीत करताना त्या म्हणाल्या, बऱ्याचदा ती गोष्ट काही बोलू नका. असं आपल्याकडे जे बोललं जातं हेच मुळी चुकीचं आहे. महिलांना हे लहानपणापासून शिकवलं जातं. असे शहाणे यांनी म्हटले आहे.

Also Read - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

काही बोलू नका हेच महिलांना सांगितलं जातं. त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो. एखादी गोष्ट त्या महिलेनं भलेही दहा किंवा पंधरा वर्षांनी सांगितलं तर काय बिघडलं.

तिनं एवढा वेळ का घेतला असेल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही महिलेला कधी बोलण्याची संधी देता का असा प्रश्न रेणूका शहाणे यांनी यावेळी उपस्थित केला.

एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये रेणूका यांनी सांगितलं की, खरं तर महिलांच्या अपमानाची सुरुवात ही घरापासूनच होते. आई वडिलांना बऱ्याचशा गोष्टी शेयर केल्या जातात.

मात्र त्यांचे जेव्हा ऐकण्याची भूमिका घेतली जाते तेव्हा आपण तो विचार करण्यामागे काय तार्किकता आहे हे मात्र लक्षात घेतले जात नाही. आणि हे वाईट आहे. तुम्ही एखादं नातं जोडता किंवा तोडता तेव्हा त्यासाठी तुमची स्वताची भूमिका असणं गरजेचं आहे.

Renuka Shahane On Me Too
Renuka Shahane: 'हम आप के है कौन' नंतर अडचणीत सापडलं होतं रेणूका शहाणेचं करिअर..अनेक वर्षांनी केला खुलासा

रेणूका शहाणे म्हणाल्या, जर एखादी बुद्धिमान महिला असेल तर तिनं उपस्थित केलेल्या प्रश्नानं अनेकांना त्रास होतो. तिचा सेटवरील वावर अनेकांना कोड्यात टाकतो.

ती जर जास्तच प्रश्न विचारत असेल तर आणखी वेगवेगळ्या अडचणी तयार होतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती महिला जेव्हा एखाद्या पुरुष अभिनेत्याविषयी प्रश्न उपस्थित करते तेव्हा तर अनेकांना ते खटकते.

Renuka Shahane On Me Too
Akshay Kumar: नरेंद्र मोदींना 'तो' प्रश्न विचारून ट्रोल झाला होता अक्षय..आता म्हणतोय,'मला PMO ऑफिसमधूनच..'

ती खूपच प्रश्न विचारते. त्याचवेळेला जर एखादा पुरुष वेगवेगळे प्रश्न विचारत असेल तर ते बरोबर असते. तो सर्वांना प्रेरणा देतो. त्याचे बोलणे सर्वमान्य असते. हेच महिलेनं केलं तर त्याचा रंग बदलतो. हे कसं, लोक महिलांना अजुनही नकारात्मक अर्थानं का घेतात असा प्रश्न रेणूका यांनी यावेळी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()