Reshma Shinde Video: आणि फॅन्सने डोक्यावर उचललं, रंग माझा वेगळा फेम अभिनेत्रीचा धम्माल व्हिडिओ बघाच

रंग माझा वेगळा मालिकेची टीम कोल्हापूरला गेली होती
reshma shinde share funy video from kolhapur ladies fan rang maza vegla
reshma shinde share funy video from kolhapur ladies fan rang maza vegla SAKAL
Updated on

Reshma Shinde Video News: स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिका सोशल मीडियावर चर्चेत आहे. रंग माझा वेगळा मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. याच प्रेमाचा अनुभव नुकताच आला. रंग माझा वेगळा मालिकेची टीम कोल्हापूरला गेली होती. त्यावेळेची उपस्थित चाहत्यांनी मालिकेतील दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेला डोक्यावर घेतलंय.

(reshma shinde share funy video from kolhapur ladies fan rang maza vegla)

reshma shinde share funy video from kolhapur ladies fan rang maza vegla
Gadar 2: सकीना फेम अमिषा पटेलचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, रिलीजपुर्वीच सिनेमा अडचणीत Amisha Patel

झालं असं कि.. रंग माझा वेगळा मालिकेची टीम कोल्हापूरला गेली होती. त्यावेळी मालिकेतील अभिनेत्री रंगमंचावर उपस्थित होत्या. रंग माझा वेगळा मधील दीपा आणि सौंदर्या म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर या सोहळ्याला उपस्थित होत्या. त्यावेळी दोघींसमोर फॅन्सची खूप गर्दी होती. कोल्हापुरात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अशातच रेश्मा सर्वांना भेटायला जाते इतक्यात एक गोष्ट घडते. खाली उभ्या असलेल्या बायका पुढे येतात आणि त्या रेश्माला उचलायचा प्रयत्न करतात. इतक्यात हर्षदा खानविलकर पुढे येतात. आणि त्या रेश्माला मागे ओढतात. रेश्मा हे घडताच खळखळून हसते. हर्षदा खानविलकर आणि खाली उभ्या असलेल्या बायका सुद्धा या प्रसंगाचा आनंद घेतात.

reshma shinde share funy video from kolhapur ladies fan rang maza vegla
Ketaki Chitale: केतकी चितळेच्या आयुष्यावर लवकरच येणार पुस्तक, तुरुंगातला संघर्षमयी प्रवास उलगडणार

रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन ट्रॅक सध्या सुरु झालाय. हा ट्रॅक काही प्रेक्षकांना आवडतोय . मालिकेच्या प्रोमोत १४ वर्षांचा लीप आला असून कार्तिक जेलमधून बाहेर आलाय.

दीपा आणि सौंदर्या त्याला भेटायला येतात. १४ वर्षांनंतर दीपिका आणि कार्तिकी आता मोठ्या झाल्या आहेत. मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर असून रंग माझा वेगळा TRP मध्ये मालिका टॉपवर असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.