रिया चक्रवर्ती ठरली 'Most Desirable Women'; दीपिका, कतरिनाला टाकलं मागे

यादीत रियाला पहिल्या स्थानी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
Rhea Chakraborty
Rhea Chakraborty Instagram
Updated on

टाइम्सची 'मोस्ट डिझायरेबल वुमेन'ची Most Desirable Women 2020 यादी नुकतीच जाहीर झाली असून यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीने Rhea Chakraborty बाजी मारली आहे. ४० वर्षांखालील विविध क्षेत्रातील ५० महिलांचा या यादीत समावेश आहे. गेल्या वर्षभरात चर्चेत राहिलेल्या आणि चाहत्यांची मनं जिंकलेल्या महिलांची ही यादी आहे. ऑनलाइन पोलद्वारे वोटिंग आणि परीक्षकांनी दिलेले गुण यावर आधारित टॉप ५० महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput मृत्यूनंतर चर्चेत आलेली रिया या यादीत पहिल्या स्थानी असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Rhea Chakraborty tops Times 50 Most Desirable Women 2020 list)

गेल्या वर्षभरात रिया चक्रवर्तीची सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांमध्ये फार चर्चा झाली. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रियाला संशयित आरोपी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करताना अमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रियाला अटकसुद्धा केली होती. सर्वच स्तरांतून टीका होत असताना संयम ठेवत या परिस्थितीवर मात करणारी रिया चर्चेच्या मध्यस्थानी होती. म्हणूनच तिला पहिलं स्थान दिल्याचं म्हटलं जात आहे.

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्ती ते दयाबेन, पाहा बिग बॉस-15 चे स्पर्धक

या यादीत रियानंतर दुसऱ्या स्थानावर 'मिस युनिव्हर्स २०२०' स्पर्धेत चौथं स्थान पटकावणारी भारताची अॅडलिन कॅस्टेलिनो आहे. त्यानंतर दिशा पटानी तिसऱ्या, कियारा अडवाणी चौथ्या आणि दीपिका पदुकोण पाचव्या स्थानी आहे. कतरिना कैफने सहावं स्थान पटकावलं असून जॅकलिन फर्नांडिस सातव्या क्रमांकावर आहे. अनुप्रिया गोयंका, रुही सिंग आणि आवृत्ती चौधरी हे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.

टॉप ५० महिलांच्या यादीत यंदा अनुजा जोशी, श्रेया चौधरी, नेहा जैसवाल, त्रिधा चौधरी, श्रिया पिळगावकर, अलाया एफ, श्रेया धन्वंतरी, कल्याणी प्रियदर्शनी आणि अदिती पोहणकर ही नवीन नावंसुद्धा समाविष्ट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.