Richa Chadha Bollywood actress: आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या रिचाला आता माफी मागावी लागली आहे. तिनं भारतीय सैन्याविषयी केलेलं वक्तव्य तिला भोवलं आहे. सोशल मीडियावरुन तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं. यानंतर रिचानं जी पोस्ट केली आहे त्यावरुन हे प्रकरण आपल्या अंगाशी आल्याचं तिच्या लक्षात आलं आहे.
बॉलीवूडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहायचं यात काही अभिनेत्रींची आवर्जुन नावं सांगावी लागतील. तापसी पन्नु, कंगना राणावत, स्वरा भास्कर आणि रिचा चढ्ढा. या अभिनेत्री दरवेळी सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होत लक्ष वेधून घेतात. वादाला सुरुवात करुन देतात. तोच वाद आपल्याला अडचणीत आणणार असे कळताच माफीही मागतात.
हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
असंच काही रिचाच्या बाबतीत झालं. तिनं भारतीय लष्कराची खिल्ली उडवणारं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर जेव्हा रिचाला ट्रोल करण्यात आले त्यानंतर तिला आपण मोठी चूक केल्याचे लक्षात आले आणि तिनं तातडीनं माफी मागितली आहे. ट्विट करत आपण जे काही बोललो त्याबद्दल माफी मागते असे तिनं लिहिलं आहे.
रिचा आपल्या ट्विटमध्ये म्हणते, माझ्या बोलण्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते. माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसेच भारतीय सैन्य दलाचा अपमान करण्याचा माझा विचारही नव्हता. माझे आजोबा हे देखील भारतीय सैन्यात उच्च पदावर होते. त्यामुळे मला भारतीय सैन्याविषयी अभिमान आहे. मी त्यांचा अपमान करणार नाही. तरीही माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावनांना ठेच लागली असेल तर त्यासाठी माफी मागते. असं रिचानं म्हटलं आहे.
काय म्हणाली होती रिचा...?
उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, 'गलवान ही कह रहा है'. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'अभद्र ट्विट. ते लवकर मागे घेतले पाहिजे, आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे योग्य नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.