ग्लॅमरस गर्ल मानसी नाईकच्या समाजकार्याची चर्चा..

लहान मुलांना पौष्टिक आहार देताना मानसी नाईकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रीकरणा दरम्यान एका सामाजिक संस्थेसोबत सहभागी होऊन तिने समाजकार्याचा आनंद घेतला आहे.
manasi naik
manasi naik google
Updated on

आपल्या दिलखेचक अदांनी आणि नृत्य कौशल्याने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईक (manasi naik) कायमच चर्चेत असते. चित्रपटातील भूमिका असू किंवा नृत्याचे कार्यक्रम ती कायमच झोकून देऊन काम करते. ती समाज माध्यमांवर प्रचंड ऍक्टिव्ह असते. तिच्या विविध उपक्रमांकडे लाखो चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. हीच ग्लॅमरस गर्ल मानसी नाईक एका व्हिडिओत सामाजिक उपक्रमात सहभागी झालेली दिसत आहे.

manasi naik
nawazuddin siddiqui : नवाझुद्दीन सिद्दीकीवर का आली लोकलने फिरण्याची वेळ..

दोन दिवसांपूर्वीच मानसी नाईकने इंस्टाग्राम वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका वस्तीत जाऊन मुलांना पौष्टिक आहाराचे वाटप करत आहे. यावेळी मानसीच्या चेहऱ्यावरचा आनंद कॅमेऱ्यामध्ये अचूक कैद झाला आहे. मानसीला लहान मुलांविषयी कायमच प्रेम वाटतअसल्याने या कामात ती अधिक आनंदी दिसत आहे.

manasi naik
११ लाखांची पैठणी जिंकण्यासाठी तयार ना? काय आहे खासियत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका गरीब वस्तीतला हा व्हिडीओ आहे. याच परिसरात मानसी नाईक एका कोळी गीताच्या चित्रीकरणासाठी गेली होती. सागरिका म्युसिक कंपनी सोबत तिचे लवकरच येणार आहे. याच गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यान तिची 'womesforwisdon' या संस्थेशी ओळख झाली आणि मानसीने त्यांच्याउपक्रमात सहभाग घेतला.

'जुलै २०२१ पासून ही संस्था गरजू आणि गरीब मुलांना दिवसातून एक वेळचे जेवण देत आहे. या पौष्टिक आहार मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दिला जातो. मला या लिटिल अँजेल्स सोबत राहून खूप समाधान मिळाले' असे मानसीने कॅप्शन मध्ये म्हंटले आहे. शिवाय 'आपण कधी कधी विचार करतो की गरिबी म्हणजे फक्त भुकेले, नग्न आणि बेघर असणे. पण तसे नाही, समाजाने दुर्लक्षित केलेले, प्रेम न मिळालेले, वंचित घटक ही सर्वात मोठी गरिबी आहे. अशा प्रकारची गरिबी दूर करण्यासाठी आपण आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे,' या 'मदर तेरेसा' यांच्या वचनांचा उल्लेखही मानसीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.