Rimjhim Gire Sawan Song : पावसाचे दिवस सुरु झाले की बॉलीवूडमधील काही गाणी हमखास आठवतात. त्यात एक गाणे इतक्या वर्षांनंतरही चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. रिमझिम गिरे सावन....हे गाणे अजूनही चाहत्यांना भुरळ घालते. या गाण्याची निर्मिती प्रक्रियाही भलतीच भन्नाट होती.
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे चार दशकानंतरही तितकेच लोकप्रिय आहे. त्यातील संगीत आणि पाऊस चाहत्यांना निखळ आनंद देऊन जाते. या गाण्याशी संबंधित एक प्रसंग हा नेहमीच सांगितला जातो. पाऊस सुरु झाल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक गाणी ऐकण्याकडे ज्यांचा कल असतो त्यात मौसमी चॅटर्जी यांचे हे गाणे नेहमीच चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरते.
Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या
हिंदी चित्रपटांमध्ये पावसाला वेगवेगळ्या प्रकारे चित्रित करण्यात आले आहे. ८० च्या दशकांत पावसाचे चित्रिकरण मोठ्या खुबीनं करण्यात आले आहे. एवढी वर्षे होऊन देखील रिमझिम गिरे सावन या गाण्यातील गोडवा काही कमी झालेला नाही. त्याच्याशी संबंधित एक किस्सा नेहमीच सांगितला जातो. मौसमी या कपिल शर्मा शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रिमझिम गिरे सावनशी संबंधित काही आठवणी सांगितल्या. १९७९ आलेल्या मंजिल चित्रपटातील ते गाणे आहे.
अभिनेत्रीनं सांगितलं की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिमझिम गाण्याची शुटिंग करणे हा एक वेगळा अनुभव होता. तो मी कधीच विसरु शकत नाही. शुटींगच्या वेळी मी नेहमीच मागे पडत असे, तेव्हा अमिताभ यांना माझ्या स्पीडशी जुळवून घ्यावे लागे. माझा चालण्याचा वेग फारच कमी होता. मुंबईमध्ये भर पावसात आम्ही त्या गाण्याची शुटिंग केली होती. तीन दिवस सारखा पाऊस कोसळत होता. त्यावर आम्ही शुटींग करत होतो.
पावसात मेक अप सतत खराब होत असायचा. कारण त्यावेळी काय वॉटरप्रुफ मेकअप नसायचा. माझा चेहरा पूर्णपणे काळा पडत असे. पावसाचा वेग इतका असायचा की, आम्हाला गाण्याचा आवाजही येत नसायचा. तेव्हा ते आम्हाला रुमाल दाखवून गाणं सुरु झाल्याचे सांगायचे. आणि पुन्हा शुटिंगला सुरुवात व्हायची. याप्रसंगी अमिताभ यांचे बंधू अजिताभ बच्चन यांनी आम्हाला खूप मदत केली होती. ते आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.