Rinku Rajguru: डोळ्यात पाणी, शब्द नाही.. आयुष्यातील पहिलं नाटक पाहिल्यावर रिंकुने व्यक्त केल्या भावना

रिंकुने आयुष्यातलं पहिलं नाटक पाहिलं आणि ती भावुक झाली आहे
rinku rajguru saw first marathi play sangeet devbabhali and write emotional post marathi actress
rinku rajguru saw first marathi play sangeet devbabhali and write emotional post marathi actress SAKAL
Updated on

Rinku Rajguru News: अभिनेत्री रिंकु राजगुरु मराठी मनोरंजन विश्वात आर्ची या नावाने प्रसिद्ध आहे. रिंकुचे आजवरचे सर्व सिनेमे चाहत्यांच्या पसंतील उतरले आहेत. रिंकु सोशल मिडीयावर सक्रीय असते.

रिंकु तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दलचे अपडेट्स तिच्या फॅन्सना देत असते. रिंकुने सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये रिंकुने तिने आयुष्यात पाहिलेल्या पहिल्या नाटकाचा अनुभव सांगितला आहे.

(rinku rajguru saw first marathi play sangeet devbabhali)

rinku rajguru saw first marathi play sangeet devbabhali and write emotional post marathi actress
Nitin Desai: नितीन देसाईंच्या मृत्युसंबंधी आरोपांवर एडलवाईस कंपनीचं स्पष्टीकरण; म्हणाले, सर्वच बाजुने...

रिंकुने पाहिलेलं पहिलं नाटक

रिंकु राजगुरुने सोशल मिडीयावर एक नवीन पोस्ट शेअर केलीय. रिंकुने प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित संगीत देवबाभळी नाटक पाहिलं.

रिंकुने हे नाटक पाहिल्यावर सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करुन रिंकु लिहीते.. माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक. अप्रतिम अनुभूती. सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे 'देवबाभळी'. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन !

रिंकु राजगुरुचं वर्क फ्रंट

रिंकु राजगुरु आता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

या सिनेमात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

खिल्लार सिनेमाबद्दल थोडंसं...

न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे 'खिल्लार' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी 'खिल्लार' चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

मूळचा पश्चिम महाराष्ट्रातला असल्यानं मकरंदनं बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय तो 'खिल्लार' चित्रपटातून मांडत आहे. रिंकू राजगुरूनं कागर या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती.

त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे. २०२४ ला रिंकुचा हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.