'KGF 2' आणि 'RRR' नाही, आता 'कांतारा' ची हवा; नवा रेकॉर्ड करत ऋषभ शेट्टीनं जिंकलं...

IMDb वर ऋषभ शेट्टीचा कांतारा हा सिनेमा नंबर १ वर पोहोचला आहे.
Rishab Shetty 'Kantara' movie beats RRR and KGF and becomes highest rated indian movie on IMDb
Rishab Shetty 'Kantara' movie beats RRR and KGF and becomes highest rated indian movie on IMDbGoogle
Updated on

Kantara: अभिनेता ऋषभ शेट्टीचा कन्नड सिनेमा 'कांतारा'ची सध्या सगळीकडेच धूम आहे. कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये ३० सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज झाला आहे तर हिंदी भाषेत १४ ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. यादरम्यान आता बातमी कळतेय की IMDb वर हा सिनेमा नंबर १ वर पोहोचला आहे. या सिनेमानं यशच्या 'KGF 2' ला आणि राम चरण,ज्युनिअर एनटीआर च्या 'RRR' ला चांगलाच इंगा दाखवत मोठी झेप घेतली आहे.

हा सिनेमा कर्नाटकमध्ये देखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे, या अॅक्शन थ्रिलर सिनेमाची केजीएफचे मेकर्स असलेल्या होम्बोले फिल्म्सने निर्मिती केली आहे. सिनेमात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत काम करत आहे. त्यानेच या सिनेमाची कथा लिहिली आहे आणि सिनेमा दिग्दर्शित केला आहे.(Rishab Shetty 'Kantara' movie beats RRR and KGF and becomes highest rated indian movie on IMDb)

Rishab Shetty 'Kantara' movie beats RRR and KGF and becomes highest rated indian movie on IMDb
हर हर महादेव मधील धारदार शब्दांचं अन् बुलंद आवाजाचं 'बाजी रं,बाजी रं' गाणं ऐकलंत का?

Kantara सिनेमाला IMDb वर १० पैकी ९.६ चं रेटिंग मिळालं आहे. कन्नड सिनेमांमध्ये देखील या सिनेमानं रेकॉर्ड केला आहे. याआधी बंपर कमाई करत मोठा रेकॉर्ड करणाऱ्या 'KGF 2' ला आयएमडीबी वर ८.४ चं रेटिंग मिळालं आहे. तर एसएसराजामौली च्या RRR सिनेमाला ८.० रेटिंग मिळालं आहे.

'KGF 2' नंतर 'कांतारा'ला कन्नड सिनेविश्वात अधिक कमाई करणारा सिनेमा मानलं जात आहे. १३ दिवसांत या सिनेमानं आपल्या मूळ व्हर्जनमध्ये म्हणजे कन्नडमध्ये ७२ करोडहून अधिक कमाई केली आहे. IMdb लिस्टमध्ये 'कांतारा' नंतर दुसऱ्या नंबरवर रक्षित शेट्टीचा '७७७ चार्ली' सिनेमा आहे. हा सिनेना बॉक्सऑफिसवर भले काही कमाल दाखवू शकला नाही,पण ओटीटीवर मात्र सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली आहे. IMDb वर या सिनेमाला 9.0 रेटिंग मिळालं आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर 'KGF 2' आणि'RRR' आहे.

Rishab Shetty 'Kantara' movie beats RRR and KGF and becomes highest rated indian movie on IMDb
'माझा हेतू लोकांना भडकवण्याचा मुळीच नाही पण... ', अरुण गोविलांच्या व्हिडीओची रंगली चर्चा

'कांतारा' सिनेमाचं बजेट १६ करोड आहे. बोललं जातं की पहिल्यांदा मेकर्सनी या सिनेमाला फक्त कन्नड सिनेमात रिलीज करण्याचं ठरवलं होतं. पण सिनेमाला ज्या पद्धतीनं, उशिरा का होईना पण जबरदस्त प्रतिसाद मिळाला तो पाहिल्यानंतर आता हिंदी,तामिळ आणि तेलुगू मध्ये सिनेमा रिलीज केला गेला आहे. कन्नड बॉक्सऑफिसवरची 'कांतारा'ची कमाई पाहिली तर ती तेजीनं वाढताना दिसत आहे. कन्नड मध्ये KGF2 ने १७१.५० करोड कमाई केली होती. आरआरआरने ८६ करोड रुपयांचे कलेक्शन केले होते,तर '७७७ चार्ली'नं ५१ करोडचा बिझनेस केला होता.

Rishab Shetty 'Kantara' movie beats RRR and KGF and becomes highest rated indian movie on IMDb
पाकिस्ताननं चोरली अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती' ची संकल्पना; हुबेहूब तसाच शो,केला फक्त एकच बदल...

'कांतारा'ची कथा कुन्दपुराची आहे. कुन्दपुरा हा कर्नाटकाच्या समुद्र किनाऱ्याजवळचा प्रदेश आहे. तिथल्या राजानं खूप वर्षाआधी आदिवासी जनतेला एक जागा भेट म्हणून दिली होती,ते घर आणि मंदीर बनवण्यासाठी. राजाला विश्वास होता की या बदल्यात आदिवासी लोकांची कुलदेवी पनजूरली त्यांची रक्षा करेल. सिनेमाच्या कथेत दाखवण्यात आलं आहे की राजाच्या कुळातील त्याच्या एका पणतूला ती जागा परत हवीय.

Rishab Shetty 'Kantara' movie beats RRR and KGF and becomes highest rated indian movie on IMDb
Air India विरोधात अभिनेत्यानं उचललं मोठं पाऊल, मनोज जोशींच्या एअरपोर्टवरील व्हिडीओनं खळबळ

राजाच्या पणतूला त्या जमिनीचं मोल जेव्हा कळतं तेव्हा ती ताब्यात घेण्यासाठी तो प्रयत्न करु लागतो. त्या दरम्यान वनविभागाचा एक अधिकारी येतो,जो गाववाल्यांना सांगतो की जंगलातील जमिनीवर कोणी आपला हक्क सांगू शकत नाही. या कथेचा हिरो आहे शिवा ऋषभ शेट्टी,ज्याच्या वडीलांना भूता कोला प्रथा ज्ञात असते. या प्रथेनुसार मनुष्य देवासारखी वेशभुषा धारण करु शकतो अनं त्याला खूश करण्यासाठी नृत्य देखील करतो. बोलतात की,असं करण्याने त्या माणसाच्या शरीरात देवाची आत्मा प्रवेश करते. शिवाला हे सगळं मान्य नसतं. आणि इथूनच पुढे सुरु होतं थ्रिलिंग कथानक. सध्या या कथानकानं प्रेक्षक वर्ग मात्र भारावला आहे तेव्हा एकदा सिनेमागृहात जाऊन पाहण्यास काहीच हरकत नाही ऋषभ शेट्टीचा कांतारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.