Rishabh Pant Accident: अनुपम खेर आणि अनिल कपूर ऋषभच्या भेटीला, म्हणाले, 'त्याची आई..'

Rishabh Pant Accident: अनुपम खेर आणि अनिल कपूर  ऋषभच्या भेटीला, म्हणाले, 'त्याची आई..'
Updated on

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघातात झाला. पंत उत्तराखंडमधील रुरकी या त्यांच्या मूळ गावी जात असताना त्यांची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली आणि कारने पेट घेतला.

आग इतकी भीषण होती की ऋषभची मर्सिडीज कार जळून खाक झाली. सुदैवाने ऋषभ यातुन थोडक्यात बचावला आता तो धोक्याबाहेर आहे आणि त्याला झोप आली अन् झोपेमुळे गाडीवरील नियंत्रण सुटले.

दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अनुपम खेर आणि अनिल कपूर ऋषभ पंतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. दोन्ही कलाकार आज सकाळी म्हणजेच डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये ऋषभ पंत आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Rishabh Pant Accident: अनुपम खेर आणि अनिल कपूर  ऋषभच्या भेटीला, म्हणाले, 'त्याची आई..'
Urvashi Rautela: फक्त तुझ्यासाठी...RP

ऋषभसोबत त्याची आई आणि जवळचे नातेवाईकही रुग्णालयात उपस्थित होते. ऋषभला भेटल्यानंतर अनुपम खेर आणि अनिल कपूर हॉस्पिटलमधून बाहेर आले तेव्हा त्यांनी ऋषभच्या तब्येतीची माहिती दिली.

तो आता ठीक असल्याचं अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. आम्ही जेव्हा येथे होतो तेव्हा आम्हाला वाटलं की देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत. त्याच्या आईलाचीही भेट घेतली. त्यांचे अनेक नातेवाईकही उपस्थित आहे.

Rishabh Pant Accident: अनुपम खेर आणि अनिल कपूर  ऋषभच्या भेटीला, म्हणाले, 'त्याची आई..'
Rishabh Pant : पंत IPL 2023 मधून बाहेर? हा खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाचा दावेदार

अनिल कपूर म्हणाले की, आम्ही संपूर्ण देशातील लोकांचे आशीर्वाद त्याच्यासाठी घेऊन आलो होतो. आम्ही त्यांनाही हसवले. खूप गप्पा मारल्या. तो लवकरच पूर्णपणे बरा झाल्यानंतर पुन्हा खेळताना दिसणार आहे.

अनुपम अनिल मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या डोक्याचा आणि मणक्याचा एमआरआय रिपोर्ट नॉर्मल आहे. पंतच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली असून त्यासाठी त्याला प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यांचे काही अहवाल येणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.