Rishi Kapoor Old VIral Video: बॉलीवूडचे दमदार अभिनेते ऋषी कपूर(Rishi Kapoor) भले आज आपल्यात नसतील तरी त्यांचे काही जुने फोटो,व्हिडीओ कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आता त्यांचा एक नवीन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिंदी सिनेमांविषयी भाष्य करताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की,''सर्व हिंदी सिनेमे एकसारखेच असतात''. ऋषी कपूर कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे,जेव्हा त्यांचा मुलगा रणबीर कपूर आणि सून आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र सिनेमा रिलीज झाला आहे आणि बॉक्सऑफिसवर बंपर कमाई करताना दिसत आहे.(Rishi Kapoor Old Video Viral On Social Media ahead spn ranbir kapoor movie brahmastra)
या व्हिडीओमध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर कपूर यांचा मूड एकदम हलका-फुलका दिसत आहे. ते म्हणताना दिसत आहेत की, ''मला सिनेमात तूम्ही कोणती भूमिका करताय हा प्रश्न विचारू नका''. ते पुढे म्हणालेयत,''आम्ही स्वतःच अनेकदा कोणती भूमिका केलीय मी असं म्हणत स्वतःवर हसतो. जेव्हा कोणत्याही अभिनेत्याला त्याच्या सिनेमातील भूमिकेबद्दल विचारलं जातं,सिनेमाच्या कथानकाविषयी विचारलं जातं तेव्हा सगळेच बोलतात,हा वेगळा सिनेमा आहे. यात काय वेगळेपण आहे हे अनेकदा त्यांनाच माहीत नसतं. प्रत्येक हिंदी सिनेमा एकसारखाच. हा तुमच्या भूमिकांमध्ये थोडा फार फरक असतो,फार नाही''.
''आपले हिंदी सिनेमे का वेगळे बनत नाहीत, कारण आपण नेहमी रोमॅंटिक स्टोरी घेऊनच सिनेमे बनवतो. म्युझिकल लव्ह स्टोरीज. मग तुम्ही त्यात पोलिसांची भूमिका करा,वकीलाची करा किंवा डॉक्टरची भूमिका करा किंवा मग एखादा बिझनेसमन साकारा, तुम्ही गाणी गात नाचताना दिसणारच त्या सिनेमात. तर मग कशाला बोलायचं भूमिका वेगळी आहे.ऋषी कपूर यांचा हा व्हिडीओ,जेव्हा ते 'आ अब लौट चले' सिनेमाचं दिग्दर्शन करत होते तेव्हाचा आहे''.
आता रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' विषयी बोलायचं झालं तर तो रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर त्याच्याविरोधात बॉयकॉट ट्रेन्ड सुरू झाला होता. रणबीरच्या गोमांस आवडतं या जुन्या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी सिनेमावर बहिष्कार घातला होता. पण सिनेमा ९ सप्टेंबरला रिलीज झाल्यानंतर बॉक्सऑफिसवर वेगळंच दृश्य पहायला मिळालं. सिनेमानं पहिल्याच दिवशी ७५ करोड कमावले आणि दुसऱ्या दिवशी ८५ करोडपर्यंत मजल मारली. त्यामुळे बॉयकॉट गॅंग हैराण झालीय की एवढं ट्रोल करुनही सिनेमानं बंपर कमाई केली कशी.
'ब्रह्मास्त्र' विषयी बातम्या समोर येत आहेत की मेकर्सनं मोठी किंमत घेऊन सिनेमाचा ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत मोठा व्यवहार केला आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे. सध्या यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती हाती लागली नाही. सिनेमा रिलीज झाल्याच्या ६ आठवड्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. कारण मेकर्सचं म्हणणं आहे की,सिनेमात जबरदस्त VFX आहे,जे पाहण्याची मजा फक्त थिएटरमध्येच येईल.
सिनेमाच्या कमाईवरनं अंदाज लावला जात आहे की या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या कालावधीनंतर बॉलीवूडचे सिनेमे थिएटरमध्ये चांगलं परफॉर्म करत आहेत. सिनेमाला पाहिल्यानंतर लोक ट्वीटरवरही प्रतिक्रिया नोंदवत आहेत. कारण यात VFX खूपच दमदार आहेत. पण यावेळी काहींच म्हणणं आहे की सिनेमाच्या कथानकात दम नाही. कदाचित आता ब्रह्मास्त्रची घोडदौड थांबवण्यासाठी बॉयकॉट गॅंगनं शेवटचा पर्याय म्हणून ऋषी कपूर यांचा जुना व्हिडीओ मेहनत करुन शोधून काढलाय आणि व्हायरल केला आहे, असं मात्र नक्कीच म्हणता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.