gauriPriya Ahuja Rajda News:'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत 'बावरी' ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियानं शो चे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्यांविरोधात आवाज उठवला.
मोनिका म्हणाली की, तिनं हा शो २०१९ मध्येच सोडला होता आणि निर्मात्यांनी तिचं ३ महिन्यांचं मानधन चक्क १ वर्षापर्यंच थकवलं,जे साधारण ४ ते ५ लाखांच्या दरम्यान होतं.
आता तारक मेहता मधील रिटा रिपोर्टर भूमिकेने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया अहुजाने गंभीर आरोप केले आहेत.
(Rita reporter aka Priya Ahuja Rajda in Taarak Mehta makes serious allegations to producer asit modi )
प्रिया आहुजा म्हणाली, 'होय, 'तारक मेहता'मध्ये काम करताना कलाकारांना मानसिक छळाला सामोरे जावे लागते. मानसिकदृष्ट्याही मी तिथे काम करताना अडचणींचा सामना केला आहे.
पण त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही...कदाचित कारण माझा नवरा मालव, जो १४ वर्षे शोचा दिग्दर्शक होता, कमवत होता. तिथे काम करण्याचा एक फायदा असा झाला की माझ्याकडे करार नसल्यामुळे मला बाहेर काम करण्यापासून कधीच रोखले गेले नाही.
असित कुमार मोदी भाई, सोहिल रमाणी किंवा जतीन बजाज हे माझ्या धाकट्या भावांसारखे आहेत, त्यांनी माझ्याशी कधीही गैरवर्तन केले नाही.
प्रिया पुढे म्हणाली, 'पण कामाच्या बाबतीत माझ्याशी अन्याय झाला आहे. मालवशी लग्न झाल्यावर त्यांनी माझा ट्रॅक कमी केला.
आता पूर्वीसारखे राहिलं नाही. प्रेग्नेंसीनंतर आणि मालवने शो सोडल्यानंतर शोमधील माझ्या ट्रॅकबद्दल मला काहीच माहिती नाही.
मी असित भाईला अनेक वेळा मेसेज केला आणि त्यांना शोमधील माझ्या ट्रॅकबद्दल विचारले पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कधी कधी ते म्हणायचे की, तु ला काम करायची काय गरज आहे, मालव काम करतोय ना? मी पण एक माणूस आहे आणि मी मालवची पत्नी आहे म्हणून हा शो मिळाला नाही. मालवशी लग्न करण्यापूर्वी मी या शोचा एक भाग होतो. मला कधीच योग्य प्रतिसाद मिळाला नाही." असा खुलासा प्रियाने केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.