Viral Video: रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'वेड' सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं रितेशनं दिग्दर्शक म्हणून आपला दबदबा निर्माण केला तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसोझानं अभिनेत्री म्हणून मराठीत आपली नवी इनिंग सुरू केली.
तसंही,रितेश आणि जेनेलिया हे इंडस्ट्रीतलं सगळ्यात प्रसिद्ध आणि क्यूट कपल आहे. सोशल मीडियावर तर त्यांचा चाहता वर्ग भलामोठा आहे. त्यांच्या व्हिडीओजना मोठी पसंती देखील मिळते. जेनेलिया आणि रितेश हे महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहेत.
नुकताच रितेशने एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तो चक्क प्रसिद्ध बॅडमिंटनपट्टू पी.व्ही सिंधूसोबत सराईतपणे बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. (Riteish Deshmukh and P.V.Sindhu Viral Video badminton award function)
रितेशने शेअर केलेला व्हिडीओ हा एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. या पुरस्कार सोहोळ्यात मंचावर रितेश देशमुख आणि पी.व्ही.सिंधू दिसत आहेत. आणि पुरस्कार सोहोळ्याच्या मंचावर दोघे बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. बरं..रितेश इतक्या सराईतपणे बॅडमिंटन खेळत आहे की ते पाहून उपस्थित कलाकार सगळेच चकित झालेले दिसत आहेत. रितेशने हा व्हिडीओ शेअर केल्यावर काही मिनिटातच तो जोरदार व्हायरल झाला. लोकांनी कमेंट्स करत रितेशचं कौतूक केलं आहे.
रितेश आणि सिंधू बॅडमिंटन खेळले ते चक्क जितेंद्र यांच्या 'ढल गया दिन,हो गई शाम' या गाण्याच्या ठेक्यावर. गाण्यावर ताल धरत रितेशनं एकही फटका चुकवलेला नाही. सिंधूच्या प्रत्येक सर्व्हिसला रितेशनं पलटवार करत तालबद्ध चोख उत्तर दिलेलं दिसत आहे.
रितेशचा हा व्हिडीओ पी.व्ही.सिंधूनं देखील शेअर केला आहे. तर रितेशनं तिचं कौतूक करत लिहिलं आहे,''तु खूप चांगली आहेस आणि सुंदर आहेस. तू मिळवलेल्या सर्व सन्मानांबद्दल मला तुझा सार्थ अभिमान आहे, आणि तुझ्यासोबत बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल जास्त अभिमान आहे. संधी मिळाली तर पुन्हा खेळू''.
रितेशनं व्हिडीओ शेअर केल्यावर त्याच्या चाहत्यांनी लिहिलंय,'तू ऑलराऊंडर आहेस..'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.