'Email V/s Female' रितेशनं घेतला बायकोशी पंगा,नेटकरी मात्र खूश

रितेश-जेनेलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Riteish Deshmukh,Genelia D'souza-Deshmukh
Riteish Deshmukh,Genelia D'souza-DeshmukhGoogle
Updated on

रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा-देशमुख(Genelia Deshmukh) हे ब़ॉलीवूडमधलं खूप हॅप्पी कपल आहे. ते नेहमीच कुठल्याही कार्यक्रमातनं मग तो कुटुंबासोबतचा असेल किंवा बॉलीवूड संदर्भातला असू दे एकमेकांसोबत खूप खूश दिसतात. अर्थात त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतर तसंच दोन मुलांचे आई-बाबा झाल्यानंतरही त्यांच्यातलं बहरत जाणारं नातं पाहिलं की कधीकधी त्यांच्या नात्याचा हेवा वाटतो. रितेश किंवा जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावरही सक्रिय पहायला मिळतात. ते नेहमीच मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतात. आता पुन्हा एक व्हिडीओ रितेशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे,ज्यावर प्रतिक्रियांचा नुसता पाऊस पडला आहे.

रितेशनं आज एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात नेहमीप्रमाणं त्यानं विनोदी ढंगात जेनेलिया आणि समस्त महिला वर्गाविरोधात एक विधान केलंय. ज्यानं सोशल मीडियावर मात्र खळबळ माजली आहे. तो व्हिडीओत म्हणताना दिसत आहे,''ईमेलने कितीही प्रगती केली असली तरी बायकांपेक्षा ते जलदगतीने बातमी पोहोचवू शकत नाही...'' हे बोलताना मात्र त्याच्या कॅमेऱ्याचा आणि बोलण्याचा रोख हा जेनेलियाच्या दिशेनं आहे.

Riteish Deshmukh,Genelia D'souza-Deshmukh
Video:आलियाची ९३ वर्षीय आजी पाहिलीत का?या वयातही देतेय नातीला टक्कर

त्यानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे,''Email V/s Female''. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांमधला समस्त पुरुषवर्ग मात्र भलताच खूश दिसत आहे. काहींनी त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे,'अगदी बरोबर', तर काहींनी म्हटलंय,'किती अचूक ज्ञान दिलं आहे'. रितेश-जेनेलिया नेहमीच असे फनी व्हिडीओ पोस्ट करीत असतात अन् आपल्या चाहत्यांची दाद मिळवत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.