Riteish Deshmukh: रितेश देशमुखने पाहिला नागराज मंजुळेचा 'बापल्योक', पोस्ट शेअर करुन केलं मोठं विधान, म्हणाला...

रितेशने नागराजचा बापल्योक सोशल मिडीयावर पोस्ट करुन सिनेमाबद्दल महत्वाची पोस्ट केलीय.
riteish deshmukh see nagraj manjule baaplyok and appreciate
riteish deshmukh see nagraj manjule baaplyok and appreciateSAKAL

Riteish Deshmukh on Baaplyok Nagraj Manjule: सध्या मराठी मनोरंजन विश्वात नागराज मंजुळे प्रस्तुत बापल्योक सिनेमाची उत्सुकता आहे. नागराज मंजुळेंसारखा संवेदनशील माणुस जेव्हा एखाद्या सिनेमाला पाठिंबा देतो, तेव्हा त्या सिनेमाची सगळीकडे चर्चा असते.

नागराज मंजुळेंच्या बापल्योक सिनेमाचा काही दिवसांपुर्वी मुंबईत प्रिमियर झाला. या प्रिमियरला अभिनेता - निर्माता - दिग्दर्शक रितेश देशमुख उपस्थित होता. यावेळी रितेशने सिनेमा पाहून सोशल मिडीयावर पोस्ट करुन सिनेमाबद्दल महत्वाची पोस्ट केलीय.

(riteish deshmukh see nagraj manjule baaplyok and appreciate)

riteish deshmukh see nagraj manjule baaplyok and appreciate
Kangana Ranaut: राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगना नाराज, सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगितलं मनातलं दुःख

रितेश देशमुख बापल्योक सिनेमा पाहून म्हणाला...

रितेशने नागराज मंजुळेची प्रस्तुती असलेल्या बापल्योक सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. आणि त्यावर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. रितेश म्हणाला, उत्कृष्ट चित्रपट, तुम्हाला हसवेल, तुम्हाला रडवेलही. नक्की पहा.

अशी प्रतिक्रिया देऊन रितेशने बापल्योक सिनेमाचं कौतुक केलंय. रितेश आणि नागराज यांची चांगली मैत्री आहे. रितेश अनेकदा नागराजच्या सिनेमाचं कौतुक करताना दिसतो.

बापल्योक सिनेमाची रिलीज डेट बदलली

‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत. रंगभूषा संतोष डोंगरे, कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे.

‘नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com