बॉलीवूड(Bollywood) अभिनेता रितेश देशुखने(Riteish Deshmukh) आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांचे खूप मनोरंजन केले. रितेश देशमुख बॉलीवूडच्या अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ,ज्यांनी प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं आहे. मग तो कमर्शिअल सिनेमा असो, कॉमेडी की पीरियड ड्रामा. रितेश देशमुखने प्रत्येक भूमिकेला मनापासून साकारलं आहे. हेच कारण आहे की बॉलीवूडच्या हरहुन्नरी कलाकारांमध्ये त्याचं नाव अग्रस्थानी आहे. त्यानं प्रत्येक भूमिकेत स्वतःला फीट बसवलं. त्याने सिनेमातील भूमिकांच्या बाबतीत खूप प्रयोगही केले. काही दिवसांपूर्वी रितेशला जेव्हा त्याच्या सिनेमातील भूमिकांविषयी विचारलं तेव्हा त्यानं जे उत्तर दिलं त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला जाणून घेऊया नेमका काय म्हणाला आहे रितेश देशमुख.(Riteish Deshmukh speaks on doing sex comedies. Says 'I did it when I was the CM's son,but...')
बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की,''एका अभिनेत्याच्या रुपात चांगलं काम आणि चांगल्या प्रोजेक्टचा भाग बनणं म्हणजे त्यांच्या कथेच्या माध्यमातून आजच्या संस्कृतीशी आणि समाजातील घटनांशी जोडलं जाणं. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की तुम्ही ज्या प्रोजेक्टला निवडलं आहे ते समाजाचं प्रतिबिंब दाखवणारं असायला हवं''. रितेश देशमुख गेल्या दोन दशकांहून सिनेइंडस्ट्रीत आपले पाय घट्ट रोवून आहे. त्याचं म्हणणं आहे की, मला खूप वेगवेगळ्या प्रोजेक्टसोबत जोडलं जाऊन प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळाले. आणि मी खूप आधीपासून भूमिकांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर दिला म्हणून हे शक्य झालं.
'धमाल' सिनेमातील रितेशच्या भूमिकेन खूप प्रशंसा मिळवली. पण जेव्हा याविषयी त्याला विचारलं क,'तो सिनेमांच्या बाबतीत निर्णय घेताना,ते निवडताना आपल्या कुंटुबाचा विचार करतो का? आपली मुलं सिनेमा पाहतील तर काय म्हणतील याचा विचार तो करतो का?' यावर उत्तर देताना रितेश म्हणाला,''मी फक्त एक अभिनेता म्हणून मला त्या भूमिकेचा आनंद मिळायला हवा हा विचार सिनेमा निवडताना करतो''.
रितेश देशमुख इंडस्ट्रीतला एकमेव अभिनेता आहे की ज्यानं एकदम ४ ते ५ सेक्स कॉमेडी(Sex Commedy) सिनेमे केले आहेत. पण यावर रितेश देशमुखचे म्हणणे आहे की,''मला याची मुळीच लाज वाटत नाही,किंवा माझा निर्णय चुकला अशी खंतही वाट नाही. जेव्हा मी ते सिनेमे केले तेव्हा तर माझे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते सिनेमे करणं माझी निवड होती. माझे आई-वडील मला कधीच याविषयी सांगायचे नाहीत. मी काय करावं,काय नाही असा हस्तक्षेप त्यांचा नसायचा. त्यांनी मला जे करायचं आहे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण जेव्हा माझ्या मुलांनी सिनेमे पाहिले तर काय असा विषय निघतो,तर त्याविषयी मी एवढंच म्हणेन की, त्यांना माझ्या कामाविषयी सध्यातरी काहीच कल्पना नाही''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.