bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता साठ दिवसांचा टप्पा पार झाला आहे. घरामध्ये एकमेकांच्या विरोधात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक टास्क मध्ये आपल्याला चढाओढ दिसत आहे. रविवारी आपण पाहिले कि, रोहित जाधव घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्या नंतर त्याने एक पोस्ट शेयर केली ज्यामध्ये त्याने रुचिराचा उल्लेख टाळला. आता तर त्याने तिच्या विषयी एक मोठं विधान केलं आहे.
(rohit jadhav comments on girlfriend ruchira jadhav after elimination bigg boss marathi 4 )
बिग बॉस मराठीच्या घरात यंदा एक कपल सहभागी झाले होते. ते म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे. केवळ खेळ नाही तर या खेळात आपले नाते टिकवणे हे देखील त्यांच्यापुढे आव्हान होते. दोन आठवड्यांपूर्वी रुचिरा घराबाहेर पडली. त्यावेळी रुचिरा आणि रोहित यांच्या नात्यात चांगलीच फूट पडली होती. रुचिराने बाहेर येताच त्याला सोशल मिडियावरून अनफॉलो केले. तसेच त्याच्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. अखेर आता रोहित देखील घराबाहेर पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्या नात्याचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाहेर आल्यानंतर रोहितने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत रोहित म्हणाला, ''ज्या आठवड्यात आमचं भांडण झालं त्याच आठवड्यात रुचिरा घराबाहेर पडली. त्या आठवड्यात आमच्या खूप वाद झाले होते. ते छोटे छोटे वाद होते, पण ते तुम्ही पाहिले असतील. जर तिला पाठिंबा द्यायचा म्हणाल तर मी तिच्याबरोबर खेळायलाही तयार झालो होतो. त्याच आठवड्यात एका टास्कमध्ये मी आणि रुचिरानेच अक्षयला पकडून ठेवलं होतं. आम्ही टीमशी प्रामाणिक होतो. आम्ही आमच्या मतावर ठाम होतो.''
''पण.. त्यांच्याबरोबर खेळू नकोस, असं रुचिराचं मत नव्हतं. आपण आपल्या पद्धतीने खेळू असे तिला वाटत होते. त्यांना त्यांचा खेळ खेळू दे, आपण आपला खेळ खेळू असे आम्ही ठरवले होते. त्यानुसार आम्ही वागतही होतो. पण त्याच आठवड्यात तिला बाहेर पडावे लागले. कुठे तरी एखादी गोष्ट एकमेकांना खटकते. तिलाही काही गोष्टी खटकायच्या. अक्षय आणि अपूर्वाचे माझ्याबरोबर फार चांगले नाते होते. त्यांचे ते खरे प्रेम आहे.''
पुढे तो म्हणाला, 'रुची जेव्हा एलिमिनेट झाली त्या आठवड्यात मी अनेक गोष्टींवर बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे तिची बाजू घेतलीच नाही असं नाही. रुचिरा घराबाहेर जाणार नाही, असे सर्वांनाच वाटत होते. पण तिचे बाहेर जाणं हे सर्वांसाठी धक्कादायक होते. घरातल्या सर्व लोकांना फार धक्का बसला होता”, असेही रोहित म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.