Rohit Pawar: TDM ची पुन्हा परवड, थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळावा म्हणून रोहित पवारांचे आवाहन

स्वतः आमदार रोहित पवार पुढे सरसावून त्यांनी TDM ला प्राईम टाइम मिळावा म्हणून सोशल मीडियावर आवाहन केलंय.
rohit pawar strong support to tdm movie that got prime time in theatre maharashtra ncp
rohit pawar strong support to tdm movie that got prime time in theatre maharashtra ncpSAKAL
Updated on

Rohit Pawar on TDM News: भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM सिनेमा ९ जुनला पुन्हा रिलीज झालाय. ख्वाडा फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा पुन्हा एकदा ९ जुनला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय.

TDM सिनेमा जेव्हा आधी म्हणजेच २८ एप्रिलला रिलीज झाला होता तेव्हा सिनेमाला अपेक्षित थिएटर मिळाले नाहीत म्हणून भाऊराव कऱ्हाडेंनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली. परंतु सिनेमा पुन्हा रिलीज होऊनही सिनेमाला प्राईम टाईम मिळाला नाही.

(rohit pawar strong support to tdm movie that got prime time in theatre maharashtra ncp)

rohit pawar strong support to tdm movie that got prime time in theatre maharashtra ncp
TMKOC: नट्टू काका सेटवर अनेकदा रडलेत, रात्रभर.. तारक मेहता मधील रोशन भाभीचा खळबळजनक खुलासा

भाऊराव कऱ्हाडे यांचा TDM सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सिनेमाला महाराष्ट्रात सकाळचे शोज मिळाले आहेत.

परंतु प्राईम टाइम म्हणजे संध्याकाळ आणि रात्री सिनेमाला शोज फार कमी मिळाले आहेत. यासाठी स्वतः आमदार रोहित पवार पुढे सरसावून त्यांनी TDM ला प्राईम टाइम मिळावा म्हणून सोशल मीडियावर आवाहन केलंय.

कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी टीडीएम चित्रपटाच्या समर्थनात पोस्ट लिहितात.. सिनेमाची वारी, आली आपल्या दारी.. ९ जून रोजी 'TDM' प्रदर्शित होतोय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा हा मराठी चित्रपट. मराठी कलाकार जिद्दी आहे, कष्टाळू आहे. तो व्यवस्थेसमोर झुकत नाही, तो विनम्र होतो केवळ प्रेक्षकांसमोर. यावेळी या चित्रपटाला थिएटर मालकांनी प्राईम टाईम शो देऊन सहकार्य करायला हवे.

त्याचबरोबर आपण सगळ्यांनी चित्रपट फर्स्ट-डे, फर्स्ट-शो बघुन, ख्वाडा, बबन, टीडीएम अशा ग्रामीण धाटणीच्या, वेगळ्या आणि चांगल्या मराठमोळ्या सिनेमांना प्रोत्साहन देऊया. मी बघणारच आहे, आपणही पाहा." अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे.

rohit pawar strong support to tdm movie that got prime time in theatre maharashtra ncp
Mike Batayeh: वयाच्या ५२ व्या वर्षी 'ब्रेकींग बॅड' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

TDM सिनेमातून दोन नव्या चेहऱ्यांना म्हणजेच नायिका कालींदी निस्ताने आणि पृथ्वीराज थोरात मोठ्या पडद्यावर आणले गेले. शिवाय चित्रपटाचाही विषय वेगळ्या धाटणीचा असून, तो प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारा होता.

मात्र, प्राईम टाईम नसल्याने, अनेक ठिकाणी शो नसल्याने हा चित्रपट चित्रपटगृहातून आधी काढला होता.

आता पुन्हा ९ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुन्हा रिलीज होऊनही भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM ला प्राईम टाइमसाठी झगडावं लागतंय हे दुर्दैव म्हणावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()