Rohit Sharma : सचिन नंतर आता 'हिटमॅन'ही झाला '१२ वी फेल'च्या 'विक्रांत'चा फॅन, म्हणाला...

'तू सध्या इतक्यात कोणता नवा चित्रपट पाहिला', असा प्रश्न हिटमॅनला (Rohit Sharma Latest News) विचारण्यात आला होता.
Rohit Sharma Reaction on Vikrant Massey
Rohit Sharma Reaction on Vikrant Masseyesakal
Updated on

Rohit Sharma Reaction on Vikrant Massey : भारताचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यामध्ये त्याला प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीनं चित्रपटाविषयी प्रश्न (Rohit Sharma Latest News) विचारला होता. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर चर्चेत आलं (12th Fail Movie) आहे. रोहितनं ज्या चित्रपटाचे नाव घेतले त्याला यंदाच्या फिल्मफेयरमध्ये अनेक पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

विधू विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेल नावाच्या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केल्याचे दिसून आले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय, या पुरस्कारांवर १२ वी फेलनं बाजी मारल्याचे दिसून आले. मनोज शर्मा नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर या चित्रपटानं प्रचंड लोकप्रियता मिळवली. बॉक्स ऑफिसवर भलेही त्यानं इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई केली असेल पण प्रेक्षकांच्या मनाचा ठाव १२ वी फेलनं घेतला.

विक्रांत मेस्सीनं या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. यापूर्वी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्याचे कौतुक केल्याचे दिसून आले आहे. त्यात करिना कपूर, हृतिक रोशन, यांचे नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील या चित्रपटाचे खूप कौतुक केले होते त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं देखील विक्रांत मेस्सीचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री मंदिरा बेदी आणि रोहित शर्माच्या त्या मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.त्यामध्ये मंदिरा ही रोहितला सध्या कोणता नवा चित्रपट पाहिला असा प्रश्न विचारते. त्यावर रोहित उत्तर देतो. मी आता एवढ्यात १२ वी फेल नावाचा चित्रपट पाहिला आणि तो मला खूपच आवडला. रोहित शर्माचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Rohit Sharma Reaction on Vikrant Massey
12th Fail movie Anand Mahindra: "राष्ट्रीय पुरस्कार मिळणारच!" '12th फेल' वर आनंद महिद्रांनी केला कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटविषयी बोलायचे झाल्यास १५ फेब्रुवारी रोजी राजकोट येथे इंग्लंड विरुद्ध तिसरी टेस्ट मॅच सुरु होणार असून त्याकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यात प्रभावी कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.