Rohit Shetty News: गोलमाल, सिंघम, सिंबा सारख्या चित्रपटांचा निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. एएनआयनं ट्विट केलेल्या फोटोनंतर रोहित शेट्टीला (Amit Shah News) नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन अनेकांना धक्का दिला होता. द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोदींची भेट (Entertainment News) घेऊन त्यांना आपल्या चित्रपटाविषयी अभिप्राय विचारला होता. यासगळ्यात रोहित शेट्टीची इंट्री म्हणजे काही मोठा धमाका होणार आहे. असं बोललं जातंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काही वेळेपूर्वी लालबागच्या राजाचे दर्शनही घेतले आहे. त्यानंतर ते भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासगळ्यात रोहित शेट्टीनं त्यांची घेतलेली भेट ही एका खास कारणासाठी असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित आता तू राजकारणात तर येत नाहीस ना, असेही त्याला चाहत्यांनी विचारले आहे.
देशाच्या गृहमंत्र्यावर चित्रपट तर तयार करत नाहीस ना, अशी विचारणा त्याला करण्यात आली आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे कुछ तो बडा होनेवाला है.... वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी आतापर्यत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बीजेपी चित्रपट, युट्युब व्हिडिओ, रिल्स यांचे महत्व जाणते. त्यामुळे त्यांना आपली लोकप्रियता कशी वाढवायची याविषयी जास्त सांगण्याची गरज नाही. अशी खोचक प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे. 2014 मध्ये बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींनी सत्ताधाऱ्यांची भेट घेतली होती.
यापूर्वी देखील रोहित शेट्टीनं अमित शहा यांची हैद्राबादमध्ये यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्याच्यासोबत आरआरआरचा स्टार ज्युनिअर एनटीआर होता. त्या भेटीची चर्चा होती. आता पुन्हा शहा आणि रोहित शेट्टी यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.