Rohit Shetty : मी फक्त सूत्रसंचालक नाही, माझा वावर स्पर्धकासारखाच ! रोहित शेट्टी यांची मुलाखत

दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणूनच नाही तर ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोचा सूत्रसंचालक म्हणूनही रोहितने कायमच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे.
Rohit Shetty
Rohit Shetty Sakal
Updated on

रोहित शेट्टी

बॉलीवूडमधील आघाडीचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणजे रोहित शेट्टी; परंतु एक दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणूनच नाही तर ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोचा सूत्रसंचालक म्हणूनही रोहितने कायमच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे.

या शोमधील स्पर्धकाची दमदार स्टंटबाजी कायम प्रेक्षकांना थक्क करणारी असते. नुकतेच या कार्यक्रमाचे १३ वे पर्व कलर्स हिंदी वाहिनीवर सुरू झाले आहे. त्यासंबंधी रोहितशी केलेली ही खास बातचीत...

नव्या पर्वात यापुढे काय-काय नवीन पाहायला मिळणार आहे?

- खरं तर ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाच्या प्रत्येका नव्या पर्वातून आम्ही कायमच प्रेक्षकांसाठी बऱ्याच नवीन गोष्टी आणत असतो. त्यामुळे साहजिकच या पर्वातही खूप काही नवीन गोष्टी आहेत आणि यापुढेही पाहायला मिळतील, हे मी नक्कीच सांगेन. हे पर्व आतापर्यंतच्या पर्वांमधील सर्वात मोठे पर्व असणार आहे.

५० दिवसांपेक्षा जास्त आम्ही याचे चित्रीकरण करत होतो आणि करायलच हवे, कारण दरवर्षी प्रेक्षकांचे खूप प्रेम या कार्यक्रमाला मिळते. हा एक लोकप्रिय असा रिअ‍ॅलिटी शो आहे. प्रेक्षकांचे भरभरून प्रोत्साहन आम्हाला मिळते, याचा आनंद आहे. पुन्हा एकदा नवीन खेळाडूंबरोबर या आधी कधीही न पाहिलेल्या नवीन स्टंटस् प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

एक सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांना खिळवून ठेवणे किती आव्हानात्मक असते?

-अर्थात ते कठीण आहे, पण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी फक्त माझाच नाही तर संपूर्ण टीमचा खूप मोलाचा वाटा आहे. विशेषतः अशा अ‍ॅक्शनवर आधारित शोमध्ये प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन प्रेक्षकांसाठी घेऊन येणे हे नक्कीच सोपे काम नाही. ते खूप आव्हानात्मक असते, पण आमची संपूर्ण टीम जवळजवळ ६-७ महिने खूप मनापासून यासाठी काम करत असते आणि आपल्या टीमची साथ लाभणे खरंच खूप महत्त्वाचे असते.

आम्ही सर्वच एकजुटीने काम करतो. त्यामुळे नवनवीन कल्पना समोर येतात. प्रत्येक पर्वातून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असतात आणि प्रेक्षकांच्या जबाबदारीची आम्हालाही जाणीव असते. कदाचित यामुळेच प्रेक्षक आजवर या कार्यक्रमाशी जोडून आहेत आणि हेच या शोच्या यशामागचे कारण आहे.

आव्हानात्मक आणि अवघड स्टंटस् स्पर्धकांना करावे लागतात, त्याबद्दल तुला काय वाटते ?

- हा कार्यक्रम तसा खूप आव्हानात्मक आणि अवघड आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच या शोची पूर्वतयारी सुरू होते. कोणत्या स्टंटस् असायला हव्या आणि कोणत्या नाही, याबद्दल संपूर्ण टीम मिळून चर्चा करते. या पर्वाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही ८ डिग्रीमध्ये सुद्धा शूट केले आहे. बऱ्याचदा रात्रभर शूट चालायचे. त्यामुळे संपूर्ण टीमसाठीच हे एक आव्हान असते.

कोणता स्पर्धक एखादा स्टंट करू शकतो, कोणता नाही करू शकत याचाही विचार केला जातो. त्यामुळे स्पर्धकांच्या दृष्टीनेही आम्ही विचार करतो आणि स्टंटस् करताना त्यांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेतली जाते. अर्थात शो जितका अवघड असेल तितकाच तो प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरतो. त्यामुळेच हा एक वेगळा शो आहे, ज्याला इतकी वर्ष प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.

या पर्वातील कोणत्या स्पर्धकाचा खेळ तुला सर्वात जास्त कौतुकास्पद वाटला?

- एका स्पर्धकाचे नाव घेणे खरंच कठीण आहे. कारण प्रत्येकजण जीव ओतून आपले १०० टक्‍के देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या स्टंटस् दरम्यान वेगवेगळा स्पर्धक आपल्याला नव्याने आश्चर्यचकित करतो. कारण कोणी अ‍ॅक्टर आहे तर कोणी गायक किंवा रॅपर. त्यामुळे प्रत्येकासाठी हे स्टंटस् किंवा खेळ नवीन होते. यापूर्वी कधीही त्यांनी आयुष्यात असे काही केलेले नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाचे कौतुक वाटते.

तुला एक स्पर्धक म्हणून या शोमध्ये जाण्याची संधी मिळाली तर ती स्वीकारशील का?

- मी जरी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलो तरीही मी स्वतःला एक स्पर्धकच मानतो. कारण होस्टींग काही सोपे नाही. बऱ्याचदा स्पर्धकांना स्टंटस् मी समजावत असतो आणि अनेकदा मी त्यांना करूनही दाखवतो. त्यामुळे मी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जरी असलो तरी एका स्पर्धकासारखाच मी तिथे वावरतो आणि मला ते खूप आवडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.