Youtuber Kamiya Jani: यूट्यूबर काम्या जानीच्या जगन्नाथ मंदिरात जाण्याने इतका गोंधळ का? भाजपने केलीय अटकेची मागणी!

प्रसिद्ध यूट्यूबर काम्या जानी ही सध्या सोशल मिडियावर चर्चेत आली आहे.
Youtuber Kamiya Jani:
Youtuber Kamiya Jani:
Updated on

Row over YouTuber Kamiya Jani's entry to Jagannath Temple: प्रसिद्ध यूट्यूबर काम्या जानी ही सध्या सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. काम्याच्या जगन्नाथ मंदिराच्या दर्शनाने एकच खळबळ उडाली आहे. ओडिशातील पुरी येथील 12व्या शतकातील जगन्नाथ मंदिरात काम्या जानीने व्हिडिओ बनवला होता.

ओडिशामध्ये श्री जगन्नाथ मंदिरात प्रवेशानंतर भारतीय जनता पक्षाने गोमांस खाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश कसा दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ओडिशा भाजपचे सरचिटणीस जतीन मोहंती यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 295 अंतर्गत तिला अटक करण्याची मागणी केली आहे.

Youtuber Kamiya Jani:
Oscars 2024 Shortlist: यंदाही भारताला ऑस्कर नाहीच! मल्याळम चित्रपट '2018' शर्यतीतून बाहेर; दिग्दर्शकानं मागितली माफी

काम्या जानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंदिराच्या आत बसलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने बीजेडी नेते व्हीके पांडियन यांच्याशी संवाद साधला.

काम्याच्या मंदिरात प्रवेश करण्यास आक्षेप घेण्यात आला असून आरोप केला की, मंदिर परिसरात व्हिडिओ कॅमेरा वापरण्यात बंदी असताना व्हिडिओ कसा शुट झाला असा सवालही उपस्थित करण्यात आलाय.

काम्या जानीने तिच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ती व्हीके पांडियन यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. यामध्ये महाप्रसादाचे महत्त्व, हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्प आणि मंदिराच्या विकासाशी संबंधित समस्यांवर व्ही.के.पांडियन बोलत आहेत.

Youtuber Kamiya Jani:
Imroz Dies: प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन!

जे गोमांस खातात त्यांना जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे तरी तिला मंदिरात प्रवेश कसा दिला असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तिच्यावर समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तिला अटक करण्यात यावी अशी मागणी भाजपणे केली आहे.

Youtuber Kamiya Jani:
Salaar Movie Review: प्रभासच्या करिअरच्या बुडत्या नावेला 'सालार' तारणार! कसा आहे सालार? वाचा रिव्ह्यू

काम्या जानीनेही दिली प्रतिक्रिया!

तर आता वाढते प्रकरण लक्षात घेता काम्या जानीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, 'भारतीय असल्याने भारतीय संस्कृती आणि वारसा जगासमोर नेणं हे माझे ध्येय आहे.

मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंगांना आणि चार धामांना भेट दिली आहे. आणि हा एक विशेषाधिकार आहे. जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा हा विचित्र लेख वाचला ज्यात माझ्या जगन्नाथ मंदिराच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

माझ्याशी कोणी संपर्क साधला आहे असे नाही, पण मला एवढेच स्पष्ट करायचे आहे की मी गोमांस खात नाही किंवा मी कधी बीफ खाल्ले नाही. जय जगन्नाथ."

तर दुसरीकडे भाजपच्या आरोपांबाबत बीजेडीने पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळून लावले. आता हे प्रकरण कोणते नवे वळण घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.