RRR Actor Death: ऑस्कर विजेता सिनेमा 'आरआरआर' मधील अभिनेता रे स्टीवन्सनचं रविवारी २१ मे रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी इटलीमध्ये निधन झालं आहे. डेडलाईनच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या प्रतिनिधीनं या दुःखद बातमीची पुष्टि केली आहे.
अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्तानं सगळेच सुन्न झाले आहेत. त्याचा मृत्यू कोणत्या कारणानं झाला याचा अद्याप खुलासा झालेला नाही. (RRR Actor Ray Stevenson passes away)
आरआरआर च्या टीमनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की,''आम्हा सगळ्यांसाठीच ही धक्कादायक बातमी आहे. रे स्टीवन्सनच्या आत्म्यास शांती लाभो. तुम्ही नेहमीच आमच्या आठवणीत रहाल..सर स्कॉट!''
रे स्टीवन्सननं एसएसएस राजामौली यांच्या पीरियड अॅक्शन ड्रामा सिनेमा आरआरआर मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती आणि त्याच्या अभिनयाला नावाजलं देखील गेलं होतं. या सिनेमात रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. आलिया भट्ट आणि अजय देवगणचे कॅमियो देखील या सिनेमात होते. सिनेमाती नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.
अमेरिकेतील आऊटलेट डेडलाइनच्या माहितीच्या आधारे, रे स्टीवन्सनचा जन्म २५ मे १९६४ रोजी उत्तर आयर्लंड मध्ये लिस्बर्न इथे झाला होता. त्यानं १९९० च्या दशकात सुरुवातीला टीव्ही सीरिज आणि टेलिफिल्म्समधनं आपलं करिअर सुरु केलं होतं. पॉल ग्रीनग्रासच्या १९९८ मधील 'द थ्योरी ऑफ फ्लाइट' मध्ये हेलेना बोनहम कार्टर आणि केनेथ ब्रानघ सोबत तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसला होता.
याव्यतिरिक्त एंटोनी फुक्काच्या 'किंग आर्थर'(२००४),लेक्सी अॅलेक्झांडरच्या 'पनिशर: वॉर जोन'(२००८),ह्यूजेस ब्रदर्सच्या 'द बुक ऑफ एली'(२०१०) आणि एडम मैककेच्या 'द अदर गाइज'(२०१०) सारख्या सिनेमातून तो दिसला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.