SS Rajamouli : 'धर्म ही सगळ्यात...' RRR चे दिग्दर्शक राजामौलीचं मोठं विधान!

यासगळ्यात राजामौली यांच्यावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसत आहे.
SS Rajamouli
SS RajamouliSakal
Updated on

RRR Director SS Rajamouli comment : भारतीय चित्रपटविश्वामध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या आरआरआर चित्रपटाची जागतिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे. हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत आहे. त्या चित्रपटातील एका गाण्याला गोल्डन ग्लोब देखील मिळाले आहे. अवतार सारख्या जगप्रसिद्ध चित्रपटानं देखील आरआरआरचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांची प्रशंसा केली होती.

यासगळ्यात राजामौली यांच्यावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसत आहे. अशावेळी राजामौली यांचे ते वक्तव्य नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. राजामौलींनी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर व्यक्त केलेली भावना ही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. भारतामध्ये धर्म यावरुन होणारं राजकारण, समाजकारण यावरुन केलेलं वक्तव्य ट्रेडिंग होताना दिसत आहे.

Also Read - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

आरआरआरनं जगभरातून मोठी कमाई केली आहे. आता या चित्रपटानं ऑस्कर घेऊनच भारतात यावं अशी लाखो भारतीयांची इच्छा आहे. अशावेळी राजामौलींनी देखील आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यापूर्वी त्यांना मिळालेल्या गोल्डन ग्लोबनं भारताला ऑस्कर मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता त्यांनी धर्म या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. इंटरनॅशनल मीडिया न्यु यॉर्करनं घेतलेल्या मुलाखतीनं राजामौली पुन्हा चर्चेत आले आहे.

राजामौली यांनी आरआऱआरच्या यशाबद्दल भारतीय प्रेक्षकांना धन्यवाद दिले आहे. मला तर टॉलीवूड हा शब्द खटकतो. त्याच्याऐवजी साऊथ फिल्म असं म्हटलं तरी चालेल. राजामौली हे नास्तिक आहे हे त्यानं यापूर्वी कित्येकदा सांगितलं आहे. मात्र दरवेळी अशी परिस्थिती नव्हती. कोणेएकेकाळी ते अध्यात्मामध्ये बुडूनही गेले होते. त्यावेळी ते भगवे वस्त्रही परिधान करत होते.

SS Rajamouli
'RRR मधील रामचरणचे पात्र अत्यंत आव्हानात्मक', अवतारच्या दिग्दर्शकानं केला कौतुकाचा वर्षाव... व्हिडिओ व्हायरल

मी तुम्हाला सांगतो माझ्याकडून बऱ्याचशा धार्मिक ग्रंथाचे वाचन केले आहे. ते वाचल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे धर्म म्हणजे एकप्रकारचे शोषण आहे. माझे चित्रपट हे रामायण, महाभारत सारख्या महाकाव्यांपासून प्रेरणा घेतलेले आहे. त्यातील गोष्टींनी मी खूपच प्रभावित झालो आहे. त्यातून मला नेहमीच खूप काही शिकायला मिळाले आहे. असेही राजामौलींनी यावेळी सांगितले.

SS Rajamouli
RRR Re-Release: 'पठाण' ला टक्कर देण्यासाठी 'RRR' पुन्हा थिएटरमध्ये...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()