Jr. NTR on Japan Tsunami News: जपानमध्ये त्सुनामीमुळे काल १ जानेवारीला मोठा हाहाकार माजला. देशातील अनेक भागात पाच वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. यामुळे जपानमधील जनजीवनावर मोठा परिणाम बसला.
अशातच या त्सुनामीमध्ये RRR फेम Jr. NTR अडकला असता. पण सुदैवाने तो बचावलाय. Jr. NTR ने स्वतःच याचा खुलासा केलाय.
ज्युनियर एनटीआर गेल्या आठवड्यापासून जपानमध्ये सुट्टी घालवत होता. 2 जानेवारी रोजी, त्याने X वर एक ट्विट शेअर करत तो घरी सुखरुप परतला असल्याचं सांगितलं आहे.
Jr. NTR ने लिहिले की, "जपानहून आज घरी परतलो आणि भूकंपाचा धक्का बसला. गेला आठवडा संपूर्ण तिथे घालवला. या भूकंपामुळे ज्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला त्यांच्याप्रती मी हळहळ व्यक्त करतो.
तुम्ही सर्व ज्या बहादुरीने या संकटाचा सामना करत आहात त्याबद्दल अप्रुप वाटतं. सर्व काही लवकर ठीक होईल. स्ट्रॉंग राहा, जपान."
एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी सेलिब्रिटी अनेकदा देशाबाहेर जातात. या वर्षी Jr. NTR ने सुद्धा त्याची पत्नी लक्ष्मी प्राणथी आणि त्याची दोन मुले, अभय आणि भार्गव यांच्यासह ख्रिसमस आणि नवीन वर्ष जपानमध्ये घालवले.
Jr. NTR जेव्हा भारतात परत आला तेव्हा जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीची मोठी घटना घडली. त्यामुळे Jr. NTR या नैसर्गिक आपत्तीपासून थोडक्यात बचावला.
त्सुनामीचा इशारा अन् लोकांना सुरक्षितस्थळी हालवलं
दरम्यान, भूकंप अन् त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर, जपानच्या किनारी भागात राहणाऱ्या लोकांना तात्काळ सुरक्षितस्थळी शिफ्ट होण्यास सांगितलं आहे. यामध्ये उंचच उंच इमारतींमध्ये आसरा घ्या. तसेच इशिकवारा इथल्या नोटो कोस्टइथं त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून इथं ५ मीटरपर्यंत लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जॅपनिज पब्लिक ब्रॉडकास्टरनं माहिती दिली की, जास्तीत जास्त २१ भुंकपाचे धक्के जाणवल्याचा अंदाज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.