RRR च्या निर्मात्यांचं ठरलं, रिलीज डेट केली जाहीर

आरआरआर (RRR) हा एक ऐतिहासिक चित्रपट (historical movie) आहे.
RRR is a fictional tale about two warriors Alluri Seetharamaraju and Komaram Bheem
RRR is a fictional tale about two warriors Alluri Seetharamaraju and Komaram Bheem Team esakal
Updated on

मुंबई - ज्या चित्रपटाची गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरु होती तो RRR नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या निर्मात्यांनी प्रदर्शित होण्याची तारीख सांगितली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता जी गेल्या दोन वर्षांपासून ताणली गेली होती. याचा निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सकारात्मक पद्धतीनं विचार करुन प्रेक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आरआरआर (RRR) हा एक ऐतिहासिक चित्रपट (historical movie) आहे. त्यातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (rrr movie release date ss rajamouli directed film will release on 13th october)

आरआरआर हा तेलुगु (telugu) भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्याचे निर्माते RRR च्या मेकर्सनं त्याबाबत पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हिरवा सिग्नल (green singal) दिला आहे. हा चित्रपट येत्या 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी ही तारीख देण्यात आली आहे. मात्र त्यावेळच्या कोरोनाच्या परिस्थितीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाचे निर्णय अवलंबून असतील. आरआरआर (RRR) मध्ये भारतीय स्वतंत्रता सेनानी कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनावर आधारित हा काल्पनिक चित्रपट आहे.

चित्रपटाच्या शुटींगचा विचार केला तर आतापर्यत त्याचे संपूर्ण चित्रिकरण पूर्ण झाले आहे. मात्र दोन गाण्याचे शुटींग बाकी आहे. अजून निर्मात्यांकडे तीन ते साडेतीन महिने आहेत. तेवढया कालावधीत हे शुटींग पूर्ण होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटींग हे हैद्राबादमधील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टॉकी पोर्शनला पूर्ण करण्यात आले आहे. आणखी दोन गाण्याचे चित्रिकरण बाकी आहे.

RRR is a fictional tale about two warriors Alluri Seetharamaraju and Komaram Bheem
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेता उज्वल धनगरचे निधन

आरआरआर मध्ये एनटीआर ज्युनिअर आणि रामचरण यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. त्यांनी तेलुगू आणि तमिळ या दोन्ही भाषांमधील डबिंग पूर्ण केले आहे. सेटवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.