'RRR' चित्रपटाची जादू केवळ भारतातच नव्हे तर जगात पहायला मिळाली.या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आणि अनेक रेकॉर्ड तयारही केले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला. दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी 'आर आर आर' च्या माध्यमातून जबरदस्त अॅक्शन ड्रामा दाखविला आहे. चित्रपटाचं बजेटही खूप मोठं होतं. 'आर आर आर' हा चित्रपट चांगलाच गाजला आणि अजूनही गाजत आहे.
चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑस्करच्या शर्यतीत 'आर आर आर' आपले स्थान नक्कीच मिळवेल असं लोकांना वाटत होत. मात्र अधिकृत यादीमध्ये गुजराती सिनेमा 'छेलो शो' (द लास्ट फिल्म शो) याला भारतातून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र तरीही राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'आरआरआर' चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सहभागी झालायं.त्यासाठी निर्मात्यांनी स्वतंत्रपणे दावा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी 'तुमच्या विचारासाठी' (FYC) मोहिमेअंतर्गत सिनेमाचं नामांकन घेतलं आहे. यात१४ श्रेणींमध्ये हे नामांकन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती देत दिग्दर्शक एसएस राजामौली आणि मुख्य अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या एका फोटोसह एक नोट 'RRR' टीमने ट्विटरवर पोस्ट केली आहे त्यात लिहिले की ‘#RRRMovie चित्रपट FYC पुरस्कार/ऑस्कर शर्यतीत सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पाठवला जात आहे, @ssrajamo सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण, पटकथा, मूळ गाणे, स्कोअर, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, ध्वनी, निर्मिती डिझाइन, व्हीएफएक्स आणि इतर आणखी काही विभाग..’
यात सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर- डी.वी.वी. दानय्या , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - एस.एस. राजामौली,सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची कथा, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून एन.टी. रामाराव ज्युनिअर आणि राम चरण, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी आलिया भट्ट तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून अजय देवगण, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट व्ही. श्रीनिवास मोहन (VFX पर्यवेक्षक), सर्वोत्कृष्ट मूळ गाणे म्हणून नाचो नाचो ,सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर मध्ये एमएम कीरावानी यांचा सामावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.