RRR Re-Release: 'पठाण' ला टक्कर देण्यासाठी 'RRR' पुन्हा थिएटरमध्ये...

RRR Re-Release
RRR Re-ReleaseEsakal
Updated on

एसएस राजामौली यांच्या 'RRR' सिनेमानं जगभरात भारी कमाई केली आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर अजय देवगण, आलिया भट्ट आणि श्रिया सरनसह अनेक स्टार्सही दिसले होते. या सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. जगभरात RRR सिनेमानं १००० करोडची कमाई केली आहे. मोठमोठे रेकॉर्ड्स या सिनेमानं आपल्या नावावर केले आहेत.

हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर विक्रम तर केलाच मात्र आता तो ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत आहे. यातील 'नातू नातू' या गाण्यालाही पुरस्कारही मिळाला. आता ऑस्करपूर्वी निर्मात्यांनी आता पुन्हा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

RRR Re-Release
Pathaan: ऐपत नाही तरी पाकिस्तानला पाहायचाय 'पठाण'! विकले जात आहेत महागडे तिकीट

'RRR' चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले असून चित्रपटाचे सहलेखन व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केले आहे. यात दोन महान क्रांतिकारकांची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात राम चरण अल्लुरी सीताराम राजू आणि ज्युनियर एनटीआर कोमाराम भीमच्या भूमिकेत आहेत.

RRR Re-Release
Oscar 2023: RRR नं रचला इतिहास..नाटू नाटू गाण्याची ऑस्करमध्ये एन्ट्री...

याशिवाय अजय देवगण, आलिया भट्ट, श्रिया सरनसह अनेक स्टार्स दिसले. संगीत दिग्दर्शन एमएम कीरावानी यांनी केले. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, जगभरात दुसरा सर्वाधिक कमाई करणारा तेलगू चित्रपट बनला.

RRR Re-Release
Akhilesh Yadav On Pathaan: अखिलेश यादव यांनाही 'पठाण'चं कौतुक, 'हा चित्रपट तर..'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 95 व्या ऑस्कर निकालापूर्वी RRR चे निर्माते हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्याची तयारी करत आहेत. निर्माते या चित्रपटाच्या रि-रिलीजसाठी थिएटरची यादी, भाषा आवृत्ती आणि वेळ शॉर्टलिस्ट करत आहेत अशी माहिती समोर आली आहे. ऑस्कर 12 मार्च 2023 रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.