दिल, दोस्ती : नवी ‘ग्लॅमरस’ जोडी!

अभिनेत्री रुचिता जाधव आणि अभिनेता प्रसाद ठाणगे ही दोघं त्यांच्या आगामी ‘सूर्या’ या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांना पहिल्यांदा भेटली आणि याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली.
Ruchita Jadhav and Prasad Thanage
Ruchita Jadhav and Prasad Thanagesakal
Updated on
Summary

अभिनेत्री रुचिता जाधव आणि अभिनेता प्रसाद ठाणगे ही दोघं त्यांच्या आगामी ‘सूर्या’ या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांना पहिल्यांदा भेटली आणि याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली.

- रुचिता जाधव, प्रसाद ठाणगे

अभिनेत्री रुचिता जाधव आणि अभिनेता प्रसाद ठाणगे ही दोघं त्यांच्या आगामी ‘सूर्या’ या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांना पहिल्यांदा भेटली आणि याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली.

प्रसाद म्हणाला, ‘रुचिताला भेटण्याआधी ती मला एक अभिनेत्री म्हणून माहीत होती. तिची कामंही मी पाहिली होती. रुचिता खूप चांगली मुलगी आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, बोलणं असा तिचा स्वभाव आहे. ती स्पष्टवक्ती आहे. तिच्या मनात एक आणि बोलण्यात दुसरंच काहीतरी, असं कधीही नसतं. हा माझा पहिला चित्रपट आहे आणि तिनं या सगळ्या प्रक्रियेत मला खूप सांभाळून घेतलं. जे मला समजायचं नाही, ते ती मला समजावून सांगायची. ती खूप नम्र आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे तिनं मला कधीही जाणवू दिलं नाही. याउलट, ती मला अनेक गोष्टी सांगायची ज्याचा उपयोग मला सीन करताना व्हायचा. या चित्रपटात आमचं एक रोमँटिक गाणं आहे. हे शूट करताना मी काहीसा ऑक्वर्ड झालो होतो. मात्र, रुचितानं मला धीर दिला आणि माझी भीती घालवली. तिची सगळ्यांची छान मैत्री होते. तिच्या बोलण्यातून वागण्यातून ती प्रत्येकाला पटकन आपलं करते, हा तिच्यातला गुण मला फार आवडतो आणि तो मला आत्मसात करायला आवडेल.’’

रुचितानं सांगितलं, ‘प्रसादला मी पहिल्यांदा भेटल्यावर तो मला अत्यंत शांत, लाजरा, गुणी मुलगा वाटला होता आणि आमच्यात मैत्री झाल्यावरही तो तसाच आहे, हे मला समजलं. त्याचा स्वभाव शांत असला, तरी माझ्याकडं तो व्यक्त होतो, मात्र तो खूप रिझर्व्हड आहे. त्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे त्याच्या अगदी जवळच्या लोकांनाच माहीत असतं. त्याला कसलीही अडचण असली, कसलंही दुःख असलं तरी ते तो उघडपणे बोलणार नाही. तो सहकलाकार म्हणूनही उत्तम आहे. तो एका निर्मात्याचा मुलगा आहे, पण मला सगळं कळतं, मला सगळं माहीत आहे, असं तो कधीही म्हणत नाही. किंवा समोरच्याला उपदेशही देत नाही. तो समोरच्याचं ऐकून घेतो. सहकलाकाराचं काय मत आहे याला तो महत्त्व देतो. त्याचप्रमाणं समोरच्याचं म्हणणं तो आंधळेणानं स्वीकारत नाही; तो त्याचं डोकं चालवतो आणि त्याला जे योग्य वाटेल तेच तो करतो. आमच्या दोघांचाही स्वभाव समोरच्याचं ऐकून घेण्याचा असल्यानं आमच्यातलं बॉण्डिंग आणखी घट्ट झालं. मी एखादा सीन करताना त्याला काही नवीन जागा सुचवली, तर त्यालाही तो सकारात्मक प्रतिसाद देतो. तो एक माणूस म्हणून, अभिनेता म्हणून बेस्ट आहे.’

चित्रपटाबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, ‘मी ‘सूर्या’ या चित्रपटात एका मिलिटरी ऑफिसरची भूमिका साकारतोय. तो बॉर्डरवरून मुंबईत येतो आणि त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्यामुळं त्यांना असं वाटतं की आता माझी खरी गरज माझ्या माणसांना आहे. जितका या चित्रपटात मी रागीट दाखवलो आहे, तितका रागीट मी खऱ्या आयुष्यात नाही. त्यामुळं मला या चित्रपटाच्या निमित्तानं स्वतःला खूप एक्सप्लोअर करायला मिळालं. रुचितानं सांगितलं, ‘आमचा ‘सूर्या' हा मराठीतला आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट आहे, कारण तीन वर्षं हा चित्रपट बनत होता. मी या चित्रपटात काजल नावाच्या आर्किटेक्चरची भूमिका साकारतेय. सूर्याच्या संपूर्ण प्रवासात तिनं त्याला साथ दिलेली आहे. ही अत्यंत ग्लॅमराईझ भूमिका आहे. खऱ्या आयुष्यात मी बऱ्यापैकी वेगळी असल्यानं मला हे काम करताना खूप मजा आली.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.