Rajpal Yadav Birthday: काही वर्षांपूर्वी राजपाल यादवचा मृत्यू झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली, काय होती घटना

आज १६ मार्च. राजपाल यादवचा वाढदिवस
rajpal yadav, rajpal yadav birthday, rajpal yadav movies, rajpal yadav comedy scenes
rajpal yadav, rajpal yadav birthday, rajpal yadav movies, rajpal yadav comedy scenesSAKAL
Updated on

Rajpal Yadav Birthday News: आज १६ मार्च. राजपाल यादवचा वाढदिवस. राजपालने आजवर अनेक सिनेमांमधून भूमिका साकारून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. राजापालच्या विविध कॉमेडी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

राजपालच्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही वर्षांपूर्वी राजपाल यादव हे जग सोडून गेला अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली होती.

(Rumors of Rajpal Yadav's death few years ago, what happened)

rajpal yadav, rajpal yadav birthday, rajpal yadav movies, rajpal yadav comedy scenes
Vanita Kharat: तुझ्या गुलाबांचा सुगंध माझ्या काळजात दरवळला

हि घटना २०१५ सालची. राजपाल यादवचं बॉलिवूड करियर जोरात सुरु होतं. राजपाल वर्षातून एखाद्या बॉलिवूड सिनेमात दिसायचा.

परंतु अचानक राजपाल यादवने जगाचा निरोप घेतला हि बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. राजपालच्या अनेक फॅन्सना काळजी वाटली. इतकंच नव्हे तर राजपाल यादवला श्रद्धांजली देणारे संदेश व्हायरल होऊ लागले.

rajpal yadav, rajpal yadav birthday, rajpal yadav movies, rajpal yadav comedy scenes
Just Neel things: इंस्टा ते थेट 70 एमएमचा पडदा.. रील स्टार नीलचे अभिनयात पदार्पण.. पोस्ट करत म्हणाला..

पण खरी गोष्ट काहीतरी वेगळी होती.. ज्या दिवशी हि बातमी वाऱ्यासारखी पसरली त्याच दिवशी राजपाल यादव नावाच्या वेगळ्या माणसाचा मृत्यू झाला होता. हा माणूस एक सामान्य नागरीक होता.

अनेकांनी त्याच्या मृत्यूचं कनेक्शन बॉलिवूड स्टार राजपाल यादवशी जोडलं. त्यामुळे फॅन्सचा गैरसमज झाल्याने त्यांनी अभिनेता राजपाल यादवला श्रद्धांजली वाहिली. परंतु खरी गोष्ट कळल्यानंतर अनेकांनी त्यांच्या श्रद्धांजली पोस्ट हटवल्या आणि दिलगिरी व्यक्त केली.

राजपाल यादवचा जन्म 16 मार्च 1971 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौजवळील शाहजहानपूर जिल्ह्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण शाहजहानपूर येथून झाले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश घेतला. पुढे थिएटरचे प्रशिक्षण घेण्यासाठी राजपाल 1992 मध्ये लखनौला गेले. येथे त्यांनी भारतेंदू नाट्य अकादमीत प्रवेश घेतला.

rajpal yadav, rajpal yadav birthday, rajpal yadav movies, rajpal yadav comedy scenes
Suruchi Adarkar: खूपच गोड लालपरी सोनपरी

राजपालने दोन वर्षे अभिनयाचं प्रशिक्षण घेतले आणि पुढे 1994 ते 1997 या काळात दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) मध्ये राजपाल गेला राहिला.

12 वी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी ऑर्डनन्स क्लॉथ फॅक्टरीमध्ये टेलरिंगमध्ये शिकाऊ शिक्षण घेतले, परंतु अभिनेता बनण्याच्या इच्छेमुळे त्यांनी नोकरी सोडली.

काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भूल भुलैय्या २ मध्ये राजपाल छोटा पंडित या गाजलेल्या भूमिकेत दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.