आई कुठे काय करते ही मराठी टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका. आई कुठे काय करते मालिकेमुळे मालिकेतील संजनाची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
रुपाली भोसलेने नुकतंच सोशल मिडीयावर तिला आदीशक्तीचा आलेला दिव्य अनुभव शेअर केलाय. हा अनुभव वाचून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल.
(rupali bhosle experience of kolhapur mahalaxmi while performance aai kuthe kay karte)
रुपाली स्टार प्रवाह गणेशोत्सव 2023 मध्ये रुपाली महालक्ष्मीच्या रुपात नृत्य करणार आहे. रुपाली सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करुन हा अनुभव सांगितला आहे. रुपाली लिहीते,"कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.
माझा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी झाला. आई मला बोलली बाकी उपास केले नहीं तरी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे पण मी जमेल तसे बाक़ीचे उपास तर करतेच पण हे गुरुवार सुधा करते."
रुपाली पुढे लिहीते, "जन्म झाला तेव्हा आई बाबा ना लक्ष्मी आली घरात अस वटल असेल का हा प्रश्न मला क़ायम पढ़ायचा.. पण वाटल असेल कारण आई बाबा नी क़ायम लक्ष्मी सारखच वागवल आणि आई चा आशीर्वाद सुधा क़ायम पाठिशी आहे आणि असेल.. स्टार प्रवाहच्या एका कारेक्रमासाठी कोल्हापुर ला गेले होते पण महालक्ष्मी च दर्शन घेता आल नाही मनाला खुप त्रास झाला आज सुधा होतो पण शेवटी ती आई च ना तिला मझ्या मनातली भावना समजली आणि जणू तीच भेटायला आली."
रुपाली शेवटी सांगते, "हया वर्षीच्या स्टार प्रवाह गणेश उत्सव च्या तालीम करायला गेले आणि मला सांगितले की मी कोल्हापुर ची महालक्ष्मी आहे आणि मी लगेच माझ्या आईला आणि मम्माला कॉल केला आणि सांगीतल… हा योगायोग आहे की काय पण हे सगळं त्या आईने च केल अस मला वाटत.. इच्छा शक्ति आणि मनापासून मारलेली हाक देवा पर्यंत पोहचते हे खरच आहे. स्टार प्रवाहचे खरच आभार."
अशी पोस्ट लिहून रुपालीने आई कुठे काय करते च्या सर्व फॅन्सचे आणि टीमचे आभार मानले आहेत.