Rutuja Deshmukh: असा टोल कापणे योग्य आहे? मराठी अभिनेत्रीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरींकडे तक्रार

मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केलीय
rutuja deshmukh complaint to cm eknath shinde and nitin gadkari for pay extra toll in mumbai pune highway marathi actress
rutuja deshmukh complaint to cm eknath shinde and nitin gadkari for pay extra toll in mumbai pune highway marathi actressSAKAL
Updated on

Rutuja Deshmukh News: टोलनाक्यावरुन सध्या बराच गदारोळ सुरु आहे. काही दिवसांपुर्वी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अडवल्याने मनसैनिकांनी टोलनाका फोडला होता.

आता मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने व्हिडीओ शेअर करत तक्रार केलीय. काय म्हणाली ऋतुजा बघुया..

(rutuja deshmukh complaint to cm eknath shinde and nitin gadkari for pay extra toll in mumbai pune highway)

rutuja deshmukh complaint to cm eknath shinde and nitin gadkari for pay extra toll in mumbai pune highway marathi actress
Janata Raja in Lucknow: योगींच्या भुमीत रंगणार 'जाणता राजा'चे प्रयोग, सलग सहा दिवस शिवरायांच्या गाथेचा भव्यदिव्य अनुभव मिळणार

 ऋतुजा पुण्याला प्रवासाला निघाली अन्...

३१ जुलैला ऋतुजा,मुलगी आणि नवऱ्यासोबत पुण्याला निघाली. ऋतुजाचं कुटुंब पुण्याला जाताना वाटेत लोणावळ्याला नेहमी थांबतात. त्या ठिकाणी खुपदा नेटवर्क नसतं. त्यामुळे तिथुन निघाल्यावर टोलचे मेसेज किंवा मेल्स मोबाइलवर उशिरा येतात.

मुंबई - पुणे प्रवासात टोलनाक्याचे दोन टप्पे

ऋजुताने शेअर केलेल्या व्हिडीओत पुढे कळुन येतं की.. सामान्यपणे मुंबई-पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर २४० रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर ८० रुपये टोल घेतला जातो. ऋतुजा पुण्याला घरी पोहोचल्यावर तिच्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला होता. त्यामध्ये खालापूरला २४० आणि तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये असे एकुण ४८० रुपये टोल कापला गेला होता.

ऋजुताने रितसर तक्रार केली पण, अजून तिला कोणाकडूनही उत्तर मिळालेले नाही. दुसऱ्या दिवशी ऋतुजा पुन्हा मुंबईला यायला निघाली तेव्हा टोल नाक्यावर गाडी थांबवून तिने तेथील मॅनेजरची भेट घेतली.

तेव्हा मॅनेजर ऋतुजाला म्हणाला, “मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापला गेलाय. आता मुंबई ते लोणावळा २४० आणि लोणावळा ते पुणे २४० असे टोलचे दोन टप्पे जेव्हापासून फास्ट टॅग लागु झाला तेव्हापासून सुरु झाले, असं मॅनेजर म्हणाले.”

अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का?

ऋतुजा या व्हिडीओत शेवटी म्हणाली, मुंबई ते लोणावळा ८३ किमी अंतर आहे तर, लोणावळा ते पुणे ६४ किमी. फक्त लोणावळ्याला थांबले म्हणुन ऋतुजाकडून दुप्पट टोल आकारण्यात आला असा सवाल तिने विचारलाय. अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का? असं ऋतुजा म्हणाली.

ऋतुजाने या व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहीले.. तुम्हाला काय वाटते? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते… कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आले, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?” असा प्रश्न अभिनेत्री ऋजुता देशमुखने या व्हिडीओमार्फत उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.