सचिन खेडेकर म्हणतात - मराठीचा आग्रह धरु या, त्यामुळे नोकरी मिळेल!

'तुम्ही मराठीत बोलायचा आग्रह धरा. खरचं आहे अस सहसा होत नाही. पण व्हायला पाहिजे.'
Sachin Khedekar
Sachin Khedekaresakal
Updated on

आपण सर्व महाराष्ट्रात राहतो. मग आपल्याला मराठी यायला नको का? तुम्ही राज्यातील कोणत्याही शहरात गेला तर एखादा मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला हिंदीतून पत्ता विचारतो. तुम्ही त्याला हिंदीतून उत्तर देता. पण तुम्हाला हा प्रश्न पडत नाही की आपण महाराष्ट्रात (Maharashtra) राहतो. येथे राहणाऱ्या माणसाला येथील राजभाषा म्हणजे मराठी येण अपेक्षित असत. येथे दुसऱ्या भाषेला विरोध करण्याचा मुद्दा नाही. मात्र आपल्या आपल्या भाषेविषयी आग्रही राहणे आवश्यक आहे. तसेच मराठी माणस बऱ्याचदा अमराठी लोकांना मराठी शिकवण्यास उद्युक्त करत नाहीत. आता हे सर्व सांगण्याचे निमित्त आहे अभिनेता सचिन खेडेकर. (Sachin Khedekar Appeal People Speaks In Marathi So Jobs Will Get)

Sachin Khedekar
माधुरी दीक्षितचे पती नेने चर्चेत, सांगतायत प्रत्येक आजारावर औषध

त्यांचा कोण होणार करोडपती या मालिकेचा ४७ सेकंदाचा व्हिडिओ चर्चेत आहे. ही मालिका सोनी मराठीवर सुरु आहे. त्यात सचिन म्हणतात, तुम्हाला काॅल सेंटरला फोन लावायचा असतो. इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी निवडता. तुम्ही एटीएममध्ये जाता पैसे काढायला..तेथे मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी पर्याय निवडता. तुम्हाला मार्केटिंगवाल्यांचा फोन येतो. तो हिंदी किंवा इंग्रजीत बोलायला लागतो.

Sachin Khedekar
Deepti Naval मैत्रीण स्मिता पाटीलच्या आठवणीने भावूक, आयुष्याच्या या वळणावर..

तुम्ही मराठीत बोलायचा आग्रह धरा. खरच आहे अस सहसा होत नाही. पण व्हायला पाहिजे. कारण हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही. हजारो लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. मराठीचा आग्रह धरु या. कारण आपल्यामुळे मराठी (Marathi) माणसाला नोकरी मिळेल. व्यवसाय मिळेल. एक पाऊल आपण टाकूया. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल!, असे सचिन खेडेकर (Sachin Khedekar) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.