Sachin Tendulkar recently lauded Saiyami Kher's bowling skills : घूमर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्याविषयी सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात गदर २ आणि ओएमजी २ विषयी बोलले जात आहे. अशातच बाल्की यांच्या घूमरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
घूमरमध्ये प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सयामीनं एका हात गमावलेल्या महिला क्रिकेटरची भूमिका केली असून तिच्या भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करत आहे. तिच्या भूमिकेचं आता क्रिकेटच्या देवानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं कौतुक केलं आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
सचिन सयामीचं कौतुक करतानाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी सयामीला दिलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. सयामीच्या यापूर्वीच्या चित्रपटांमधील भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते. आता सध्या तिच्या घूमर मधील अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.
आर बाल्की यांच्या घूमर चित्रपटानं चाहत्यांची, समीक्षकांची वाहवा मिळवली आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिनची त्यावरील प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. सचिननं घूमरमध्ये सयामीनं ज्या महिला फिरकीपटूची भूमिका साकारली आहे त्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. १८ ऑगस्ट रोजी बाल्की दिग्दर्शित घूमर हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. एकीकडे सनीच्या गदर २ ने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे घूमरनं देखील प्रेक्षकांना अवाक् केले आहे.
सचिननं घूमर पाहिल्यानंतर सयामीशी संवाध साधला. आणि तिच्या भूमिकेची वाहवा केली. सयामीनं चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं फिरकीपटूची भूमिका निभावली त्याविषयी तिला काही प्रश्नही विचारले. त्या दोघांच्या संवादाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे.
सयामीनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात सचिन तिला तिच्या गोलंदाजीच्या कौशल्याविषयी काही प्रश्न विचारतो आहे. त्याचवेळी सयामी त्याला तितक्याच आत्मविश्वासानं उत्तर देताना दिसून येते. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.