Subrato Roy Biopic: सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री दुःखद निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर राजकीय व्यक्तींपासुन मनोरंजन विश्वातील अनेक व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान काही दिवसांपुर्वी द केरळ स्टोरी फेम दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी सुब्रत रॉय यांच्या बायोपीकची घोषणा केली होती. त्याविषयी जाणुन घेऊ.
सुब्रतो रॉय यांचा बायोपीक
काही महिन्यांपूर्वी सुब्रत रॉय यांचा जीवनपट ‘सहाराश्री’ या चित्रपटाच्या रूपाने मोठ्या पडद्यावर आणण्याची घोषणा करण्यात आली होती. 'द केरळ स्टोरी' फेम दिग्दर्शक सुदीप्तो सेन सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होते.
प्रसिद्ध निर्माते संदीप सिंग आणि जयंतीलाल गडा हे बायोपीकची निर्मिती करणार होते. 'सहाराश्री'च्या घोषणेसोबतच, निर्मात्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील रिलीज केले.
या पोस्टरमध्ये सुब्रत रॉय यांची स्वाक्षरी असलेला 25 हजार कोटी रुपयांचा धनादेश दाखवण्यात आला होता. त्यावर नाव होतं The People Of India. चित्रपटाचे गीत गुलजार तर संगीताची जबाबदारी ए.आर.रहमान यांच्याकडे होती.
बायोपीकबद्दल अपडेट्स काय?
सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची घोषणा त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली. धूमधडाक्यात या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण करणार आहे किंवा त्याचे शूटिंग कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
देशभरात 'सहाराश्री' म्हणून प्रसिद्ध असलेले सुब्रत रॉय सहारा यांनी 1978 साली गोरखपूरमध्ये व्यवसाय सुरू करून सहारा इंडिया परिवाराची पायाभरणी केली. बुद्धीमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी एवढे नाव कमावले होते की, २०१२ मध्ये इंडिया टुडे मासिकाने सुब्रत रॉय यांचा भारतातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश केला होता. सुब्रत रॉय यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.