साउथ अभिनेत्री साई पल्लवी ही नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटामुळे तर कधी तिच्या पोस्टमुळे. साईपल्लवी सोशल मिडियावर कमी सक्रिय असते.
मात्र तिच्या पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. साईपल्लवीच्या चाहत्यांची संख्या खुप आहे. तिच्या साधेपणामुळे ती सर्वांचे मन जिंकत असते. साईनं नुकतीच आपल्या आईवडिलांसह अमरनाथ यात्रा पूर्ण केली, ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेयर केले आहेत.
यादरम्यान तिने तिच्या आईवडिलांचे फोटो शेयर करत एक नोटही शेयर केली आहे. ज्याच तिने प्रत्येक क्षणाची माहिती आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.अमरनाथ यात्रेला जाण्याचे तिचे खूप दिवसांपासून स्वप्न होते, असं तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
साईपल्लवी या पोस्टमध्ये म्हणते की, आपल्या 60 वर्षांच्या आई-वडिलांसोबत हा प्रवास करणे खुप मोठे भावनिक आव्हान होते. त्यांना श्वास घेण्याची धडपड, निसरड्या वाटांवर थांबताना पाहून मला प्रश्न पडला की सर्वशक्तिमान परमेश्वर इतका लांब का आहे?
मात्र जेव्हा दर्शन घेवुन परत येताना त्याच्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा प्रवासी इतर प्रवाशांना निराशा होतांना पाहतात तेव्हा ते मोठ्याने 'ओम नमः शिवाय' म्हणतात. यामुळेच त्यांच्यात नवीन ऊर्जा मिळते आणि ते चालायला लागतात.
पुढे तिने अमरनाथ श्रीन बोर्डच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. जे तिच्यासारख्या करोडो भक्तांना मदत करायचे. त्यांची ही यात्रा ही अविस्मरणीय बनवण्याचे काम करतात.
ती लिहिते की, 'निःस्वार्थ सेवा देणाऱ्या आणि आम्हाला मदत करणाऱ्या लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार.
आमची संपत्ती, सौंदर्य आणि सामर्थ्याच्या पलीकडे, निरोगी शरीर, एक मजबूत मन आणि इतरांना मदत करणारं हृदय, ज्यामुळे आपला पृथ्वीवरील प्रवास जगण्यालायक होतो. अमरनाथ यात्रेने माझ्या इच्छाशक्तीला आव्हान दिलं,
माझ्या शरीराची परिक्षा घेतली आणि हे सिद्ध केले की जीवन हे देखील तीर्थक्षेत्र आहे. असे काही लोक ज्याच्यामुळे मी ही यात्रा करु शकले त्यांचे मनःपूर्वक आभार.".
सध्या साईपल्लवीची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी तिचं कौतुकही करत आहेत. तर काहींनी पुन्हा एकदा बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या अभिनेत्रींची तुलना केली आहे. जिकडे काही अभिनेत्री पार्टी आणि पबमध्ये जीवनाचा आनंद घेत आहेत तिथे साईपल्लवी तिर्थक्षेत्रातला भेटी देत असल्याने नेटकरींनी तिचं कौतुक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.